साताऱ्यात ८ जण तडीपार, एसपी पंकज देशमुखांची धडक कारवाई

tadipar
tadipar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | योगेश जगताप

मारामारी, खंडणी व खुनाचा प्रयत्न करण्याच्या गुन्ह्यात सक्रिय असलेल्या ८ जणांना आज साताऱ्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुख यांनी तडीपार केलं आहे. एका महिन्यात तडीपाराचा दुसरा दणका एसपी साहेबांनी दिल्यामुळे गुंडगिरी करणाऱ्यांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. सातारा, मलकापूर, कराड आणि कोंडवे अशा परिसरातील हे रहिवासी असून २७ ते ३५ वर्ष वयोगटातील सर्वजण आहेत. यामध्ये श्रीरंग आवळे, सुजित आवळे (बुधवार नाका, सातारा), अमीर शेख, समीर मुजावर, लाजम होडेकर (कराड), गणेश निंबाळकर, योगेश निंबाळकर, आदिनाथ निंबाळकर (कोंडवे) अशी ३ वेगवेगळ्या गटांतील तडीपार केलेल्यांची नावे आहेत. सर्वसामान्य जनतेकडून सतत तक्रारी आल्याने अधिक्षकांनी तातडीने कारवाई करण्याचा निर्णय घेतला.