हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पश्चिम महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून मुसळधार पाऊस (Satara Rain Update) सुरु आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली आणि पुणे जिल्ह्याला पावसाने चांगलंच झोडपून काढलं असून रस्त्ये आणि नद्या पाण्याने तुडुंब भरले आहेत. सातारा जिल्ह्यातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. हवामान विभागाकडून सातारा जिल्ह्यासाठी आज आणि उद्या असे दोन दिवस रेड अलर्ट देण्यात आला आहे. त्यानंतर पुढील दोन दिवसांसाठी सुद्धा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने सातारा जिल्ह्यासाठी आजपासून पुढील चार दिवस पावसाचे असणार आहेत. त्यामुळे सातारकरांनी सावध राहावे. कामाविषयी घराबाहेर पडू नये.
साताऱ्यात मुसळधार पाऊस – Satara Rain Update
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्याला पुढील २ दिवस जोरदार पावसाचा इशारा (Satara Rain Update) देण्यात आला आहे. तर मैदानी भागात हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात दमदार पाऊस होत आहे. महाबळेश्वर तालुक्यातही जोरदार पाऊस होत आहे. मुसळधार पावसामुळे कोयना धरणात 60.42 टीएमसी इतका पाणीसाठा झाला असून धरण 57.41 टक्के भरले आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे. पाटण, जावळी, महाबळेश्वर आणि सातारा तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरूच आहे.
उर्वरित महाराष्ट्राच्या हवामानाबद्दल सांगायचं झालयास, मुंबईमध्ये मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार, असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. पुणे विभागाला आज येल्लो अलर्ट देण्यात आलेला आहे. घाट माथ्यावर देखील अति मुसळधार पाऊस पडेल असा देखील अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. कोल्हापुरात पावसाने थैमान घातलं आहे. अनेक ठिकाणी पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नद्यांच्या आणि धरणांच्या पाणी पातळीमध्ये वेगाने वाढ झाल्याने रस्ते वाहतुकीवर विपरीत परिणाम झाला आहे.त्याचप्रमाणे अकोला, अमरावती, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा, वाशिम, गोंदिया, यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडणार आहे. त्यामुळे हवामान विभागाने या विभागांना येल्लो अलर्ट जारी केला आहे.