पोलिस अधिक्षक बन्सल यांच्याकडून स. पोलिस निरिक्षक पदाच्या तीन अधिकार्‍यांच्या बदल्या

0
285
Ajaykumar Bansal Satara Police
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा | पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांनी शनिवारी रात्री उशिरा पोलिस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. लोणंद, पुसेगाव, सातारा शहर, रहिमतपूर अन् कराड येथील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत.

लोणंद पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष चौधरी यांची पदोन्नती झाली असली तरी त्यांना सोडण्यात आले नसल्याने त्यांची नियंत्रण कक्षाला बदली करण्यात आली आहे. सातारा शहर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मच्छले यांची पुसेगाव पोलीस ठाणे येथे तर शाहूपुरीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर यांची लोणंदला बदली करण्यात आली आहे.

तसेच कराड तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड यांची रहिमतपूर येथे बदली करण्यात आली आहे. या सर्व पोलिस अधिकाऱ्यांना तात्काळ हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सातारा जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here