Hello Krushi App : घरबसल्या 1 मिनिटांत काढा 7/12 उतारा, ते सुद्धा अगदी मोफत; ‘ही’ Trick वापरा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शेतकरी मित्रांनो, शेती करत असताना जमिनीचा सातबारा उतारा (Hello Krushi App) आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असतो. शेतीशी निगडित कोणत्याही सुविधेचा फायदा घ्यायचा असेल तर सर्वात आधी सातबारा उतारा मागितला जातो. त्यातच तलाठी कार्यालयातून सातबारा उतारा काढायचा म्हंटला तर अनेक चकरा माराव्या लागतात आणि आपला वेळही जातो. मात्र आता तुम्हाला तुमच्या मोबाईल वर घरबसल्या सातबारा उतारा काढता येणार आहे. विशेष म्हणजे अगदी काही मिनिटात आणि 1 रुपया सुद्धा खर्च न करता तुम्हाला हि सेवा मिळत आहे.

अँप डाउनलोड करा

होय, हॅलो कृषी हे मोबाईल अँप तुमच्या मोबाईल मध्ये डाउनलोड करून तुम्ही घरबसल्या सातबारा उतारा, 8 अ उतारा काढू शकता. विशेष म्हणजे शेतकऱ्यांना समजेल अशा अगदी सोप्प्या पद्धतीने यावर हे उतारे काढण्याची सोय केली आहे. यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर सुद्धा टाकण्याची आवश्यकता नाही आणि ecaptcha भरण्याची सुद्धा गरज नाही. आम्ही सांगत असलेली Trick वापरून तुम्ही 1 मिनिटात हवा तो सातबारा सहज डाउनलोड करून घेऊ शकता. याकरिता तुम्हाला नक्की काय करावं लागेल हे आम्ही खाली सविस्तर सांगितले आहे.

सातबारा मिळवण्यासाठीच्या सोप्या स्टेप्स खालीलप्रमाणे – 

1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जाऊन Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

3) आता Hello Krushi ऍप ओपन करुन होम पेज वरील ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

4) त्यानंतर तुम्हाला त्यामध्ये पुन्हा 6 विभाग मिळतील सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई -चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. इ. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा कोकण, पुणे.. )

6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. सिंधुदुर्ग, नागपूर, सातारा.. )

7)आता तालुका निवडा (उदा. कराड, कुडाळ, उमरेड..)

8)गाव निवडा (उदा. काले, वर्दे… )

9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.

10) गट नंबर हा पर्याय निवडा , ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा.(येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव,मधले नाव ,सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी अप स्वतःच तुमचा captcha भरेल.

13) त्यानंतर तुमचा सातबारा दिसेल, ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

1) हॅलो कृषी अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.
2) आपली शेतजमीन 1 रुपया सुद्धा खर्च न तुम्ही मोजू शकता
3) सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज पाहू शकता
4) जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय खरेदी विक्री करता येते.
5) तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.
6) जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येते. यामुळे एजंटला जाणारा पैसे वाचतो.
7) महाराष्टरातील कोणत्याही बाजार समितीमधील प्रत्येक मालाचा रोजचा बाजारभाव चेक करता येतो.
8) शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.

हॅलो कृषी हे शेतकऱ्यांसाठी बनवलेलं अँप आहे. शेती करत असताना येणाऱ्या अडचणींवर मात करून शेतकऱ्यांचे काम सोप्प कस करता येईल याकडे आम्ही लक्ष्य दिले आहे. त्यामुळे अगदी सोप्या भाषेत आणि मुख्य म्हणजे 1 रुपया सुद्धा खर्च न करता हॅलो कृषी तुम्हाला सर्व वरील सुविधा देत आहे. त्यामुळे आजच गुगल प्ले स्टोर वर जाऊन Hello Krushi डाउनलोड करा आणि या सर्व सुविधांचा लाभ घ्या.