Satbara Utara : सातबारा उतारा होणार अधिक सुटसुटीत; कालबाह्य नोंदी कमी करण्याच्या सूचना

Satbara Utara expired records
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सातबारा उताऱ्याबाबत (Satbara Utara) एक मोठी अपडेट समोर येत आहे. सातबारा उताऱ्यावरील अपाक शेरा, एकुमॅ नोंद, तगाई कर्ज, बंडींग कर्ज, भूसुधार कर, इतर पोकळीस्त नोंदी अशा कालबाह्य नोंदी आता कमी होणार आहेत. महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत सूचना दिल्या असून या निर्णयामुळे सातबारा उतारा हा अधिक सुलभ आणि सुटसुटीत होणार आहे. तसेच तो अधिक स्पष्ट आणि समजण्यास सोप्पा होणार आहे.

खरं तर सातबारा उताऱ्यावरील (Satbara Utara) कालबाह्य नोंदीमुळे शेतकऱ्यांना जमिनीचे खरेदी-विक्री व्यवहार अथवा कर्ज प्रकरणे, भूसंपादन नोबदला आदी कामकाजावेळी मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. या सर्व पार्श्वभूमीवर सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य व निरुपयोगी नोंदी कमी करण्याची मोहीम राबविण्याची सूचना महसूल विभागाने सर्व जिल्हाधिकारी यांना दिली आहे. राज्य शासनाच्या महसूल विभागाने जिवंत सातबारा उतारा ही मोहीम यापूर्वीच राबविण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेच्या दुसऱ्या टप्प्यात सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करून सातबारा उतारा अद्ययावत करण्यात येणार आहे.

घरबसल्या मोबाईलवर काढा सातबारा उतारा – Satbara Utara

मित्रानो, शेतीशी निगडित कोणतेही काम असो, किंवा कोणत्या योजनेचा लाभ घ्यायचा असो यासाठी जमिनीचा सातबारा उतारा (Satbara Utara)तुम्हाला मागितलाच जातो. अशावेळी गावातील तलाठी कार्यालयात जाऊन सातबारा उतारा काढायचा म्हंटल तर आपला वेळही जातो आणि पैसेही खर्च होतात. आणि हेलपाटे घालायला लागणे  वेगळच…. परंतु आता याचे टेन्शन घेऊ नका. तुमच्या जमिनीचा सातबारा उतारा तुम्हाला घरात बसून काढता येणार आहे, तशी खास सुविधाच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय. Hello Krushi या मोबाईल अँप वर 1 रुपयाही खर्च न करता तुम्ही सातबारा उतारा काढू शकताय. कसे तेच आम्ही तुम्हाला अगदी सोप्प्या भाषेत सांगणार आहोत.

1) सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवरील गुगल प्ले स्टोअरवर जा. तिथे Hello Krushi असं सर्च करुन ‘हॅलो कृषी’ नावाचे ऍप डाउनलोड करा. Link https://play.google.com/store/apps/details?id=com.appdroid.hellokrushi&hl=en_IN

2) हॅलो कृषी अँप Install केल्यानंतर यामध्ये सर्वप्रथम तुमचे नाव, मोबाईल नंबर आणि शेतीविषयक आवश्यक माहिती भरा.

3) आता Hello Krushi होम पेज वर जाऊन ‘सातबारा व भूनकाशा’ हा विभाग निवडा.

4) यामध्ये तुम्हाला सातबारा, डिजिटल सातबारा, भू-नकाशा, ई-चावडी, भूमी अभिलेख, जागेचे बाजारमूल्य. असे 6 विभाग दिसतील. यापैकी सातबारा विभागावर क्लिक करा.

5) त्यानंतर आपला विभाग निवडा ( उदा अमरावती, नाशिक, कोकण)

6) त्यानंतर जिल्हा निवडा (उदा. अकोला अहमदनगर , रत्नागिरी .. )

7) आता तालुका निवडा (उदा. बाळापूर ,मालेगाव , लांजा ..)

8) गाव निवडा (उदा. कडोशी , कजवाडे, असोडे )

9) आता तुम्हाला एक पान दिसेल ज्यात ‘७/१२’ हा पर्याय निवडा.

10) त्यानंतर गट नंबर हा पर्याय निवडा, ‘शोधा’ या बटन वर क्लिक करा. (येथे तुम्ही केवळ आडनाव, पहिले नाव, मधले नाव, सर्वे नम्बर /गट नंबर टाकून सुद्धा उतारा शोधु शकता)

11) आता तुम्हाला गटामधील इतर नंबर दिसतील. यातील तुमचा नंबर निवडा.

12) आता e captcha चा पर्याय दिसेल. परंतु तुम्हाला हा e captcha भरण्याची आवश्यकता नाही. कारण हॅलो कृषी स्वतःच तुमचा captcha भरेल.

13) आता तुम्हाला तुमचा सातबारा उतारा दिसेल. त्यानंतर ‘डाउनलोड करा’ या बटन वर क्लिक करून उतारा डाउनलोड करून घ्या. त्याची प्रिंट काढून घ्या. Link : https://bit.ly/HelloKrushiApp

हॅलो कृषी मोबाईल अँप वर कोणकोणत्या सुविधा आहेत?

1) Hello Krushi अँप वर शेतकऱ्यांशी संबंधित सर्व सरकारी योजनांना एका क्लीक वर अर्ज करून लाभ घेता येतो.

2) तुम्ही कोणतीही शेतजमीन 1 रुपया सुद्धा खर्च न करता अगदी फुकटात मोजू शकता

3) तुम्हाला अगदी फुकट मध्ये सातबारा उतारा काढून मिळतो.

4) हॅलो कृषीमध्ये तुम्हाला सलग 4 दिवसांचा हवामान अंदाज कळतोय.

5) महाराष्ट्रातील सर्व बाजार समितीतील सर्व पिकांचा रोजचा बाजारभाव कळेल.

6) तुमच्या आसपासच्या रोपवाटिका, खत दुकानदार, यांच्याशी थेट संपर्क साधू शकता.

7) तुमच्याकडे असलेली जुनी वाहने, जनावरे, शेतजमीन यांची एजंटशिवाय थेट खरेदी विक्री करता येते.

8) म्हैस – गाई कुत्रा यांसारख्या जनावरांची थेट खरेदी- विक्री करता येत असल्यामुळे एजंटला जाणारा पैसा वाचतो.

9) शेतकरी स्वतः पिकवलेला शेतमाल त्याला हव्या त्या किमतीत विकू शकतो.