Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना मोठा दिलासा ! ‘या’ योजनेअंतर्गत मिळणार 12 तास वीज

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

Saur Krushi Vahini Yojana | शेतकऱ्यांना शेती करताना इतर सगळ्या गोष्टीची देखील खूप काळजी घ्यावी लागते. जसं की,पिकांना वेळोवेळी खत देणे, पाणी देते देणे, त्याचप्रमाणे त्यांचे संरक्षण करणे. परंतु आजकाल खेडेगावात लाईटची समस्या खूप मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. दिवसा लाईट टिकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा त्यांच्या पिकांना पाणी देता येत नाही. आपले सरकार देखील राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा पाणी देता यावे म्हणून वीज उपलब्ध करून देण्यासाठी खूप प्रयत्न करत आहेत.

शेतकऱ्यांच्या फायद्यासाठीच आता राज्यात सौर कृषी वाहिनी योजना (Saur Krushi Vahini Yojana)2.0 ही योजना सरकारकडून जलद गतीने राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत शासनाला जो प्रकल्प उभा करायचा आहे. त्या प्रकल्प उभारणीसाठी देखील जमीन उपलब्ध झालेली आहे. या प्रकल्पाला देखील खूप चांगला प्रतिसाद मिळालेला आहे आणि हा प्रतिसाद बघता 8000 मेगावॅट वीज निर्मितीसाठी जी निविदा प्रक्रिया होती, ती प्रक्रिया देखील आता सरकारकडून पूर्ण झालेली आहे. ही प्रकल्प उभारणी करण्यासाठी सरकारने कंपन्यांना 8 महिन्यांची शेवटची तारीख दिलेली आहे. (Saur Krushi Vahini Yojana)

शेतकऱ्यांना दिवसा आणि रात्री सिंचनासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. त्यांना योग्य पद्धतीने वीज पुरवठा होत नाही. परंतु आता सरकारच्या या नवीन प्रकल्पातून वीज Saur Krushi Vahini Yojana उपलब्ध झाल्यानंतर दिवसात आणि रात्री देखील पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना एक प्रकारचा दिलासा मिळणार आहे.

वीज दर देखील होणार कमी | Saur Krushi Vahini Yojana

राज्य सरकारचे मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0 यामध्ये ज्या निविदा सादर झालेला आहे. त्या निविदांमध्ये 2 रुपये 90 पैसे ते 3 रुपये 10 पैसे प्रति युनिट या दराने शेतकऱ्यांना वीज उपलब्ध करून देणार आहे. सध्या 7 रुपये प्रति युनिट दराने मिळणारी वीज शेतकऱ्यांना दीड रुपये प्रति युनिट दराने दिले जाते. म्हणजेच शेतकऱ्यांना यात देखील फायदा होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे काम पूर्ण झाल्यानंतर देखील शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध होणार आहे. त्यांचा आर्थिक फायदा देखील होणार आहे आणि पिकांसाठी देखील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे.