विराटऐवजी रोहितला कॅप्टन केलं कारण…. गांगुलीने स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । २०२१ च्या दरम्यान, भारताचा तत्कालीन विराट कोहलीने (Virat Kohli) कर्णधारपदाचा राजीनामा दिला, आणि त्यानंतर रोहित शर्माच्या (Rohit Sharma) हाती भारताच्या सर्व प्रकारच्या क्रिकेटची धुरा आली. विराट कोहलीच्या राजीनाम्यानंतर त्यावेळचा बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली (Saurav Ganguy) आणि कोहली यांच्यातील मतभेदाच्या चर्चाही रंगल्या होत्या. तयावेळी विराटला कर्णधारपद सोडण्यास मनाई केल्याचे गांगुलीने म्हटले होते. तर विराटने स्पष्टपणे सांगितले की, कर्णधारपद सोडण्यापासून मला कधीही रोखले नाही. आता रोहित शर्माचे कौतुक करताना गांगुली म्हणाला, रोहितला त्यावेळी कर्णधार केलं कारण त्याच्यातील क्षमता आपण बघितली होती.

सौरव गांगुलीने RevSports शी बोलताना रोहित शर्माचे कौतुक केले आहे. तो म्हणाला, रोहित शर्मा एक महान कर्णधार आहे. आम्ही त्यावेळी रोहित शर्माला कर्णधार बनवले कारण त्यांच्यामध्ये क्षमता दिसली होती. नुकत्याच पार पडलेल्या वर्ल्पकप स्पर्धेत रोहितने दाखवून दिले कि नेतृत्व कस करायचं. मला वाटतं की फायनल हरेपर्यंत भारत हा स्पर्धेतील सर्वोत्तम संघ होता. रोहित जेव्हा कर्णधार झाला तेव्हा मी अध्यक्ष होतो. आणि त्याने संघाचे नेतृत्व कसे केले याचे मला आश्चर्य वाटत नाही. मी त्याला कर्णधार बनवले कारण मला त्याच्यामध्ये ती क्षमता दिसली आणि त्याने जे केले त्याचे मला आश्चर्य वाटत नाही असे गांगुलीने म्हंटल.

दरम्यान, रोहित शर्माने आत्तापर्यन्त भारतीय संघाचे नेतृत्व करताना संघाला अनेक ऐतिहासिक विजय मिळवून दिले. रोहित हा महेंद्रसिंघ धोनी प्रमाणेच शांत चित्ताने रणनीती आखत असतो. तसेच युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी देऊन त्यांना योग्य ते मार्गदर्शन सुद्धा रोहित करत असतो. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ICC T20 विश्वचषक 2022 च्या उपांत्य फेरीत आणि ICC विश्वचषक 2023 च्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कसोटी क्रिकेटमध्येही रोहितच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.