Sourav Ganguly : सौरव गांगुलीचा गंभीरला विरोध? ट्विट करत BCCI ला दिला थेट इशारा?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । BCCI सध्या भारतीय संघाच्या नवीन प्रशिक्षकाच्या शोधात आहे. बीसीसीआय नव्या कोचची चाचपणी करत असून यामध्ये माजी क्रिकेटपटू आणि कोलकाता नाईट रायडर्सचा मेंटॉर गौतम गंभीरचे (Gautam Gambhir) नाव आघाडीवर आहे. गंभीर आणि बीसीसीआयचे सचिव जय शाह यांच्यात चारचा सुद्धा झाली असून गौतम गंभीरच टीम इंडियाचा नवा प्रशिक्षक होईल असं बोललं जात आहे. मात्र त्याच दरम्यान, बीसीसीयायचा माजी अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांच्या एका ट्विटने खळबळ उडाली आहे. भारतीय क्रिकेटचा कोच कसा असावा याबाबत गांगुलीने सांगितलं आहे. परंतु त्याचा या ट्विटमुळे गौतम गंभीरच्या नावाला गांगुलीचा विरोध आहे का? अशा चर्चाना बळ मिळत आहे.

काय आहे सौरव गांगुलीचे ट्विट?

कुणाच्याही जीवनात प्रशिक्षकाचं महत्त्व, त्याचं मार्गदर्शन आणि निरंतर प्रशिक्षण कुणाच्याही जीवनाला आकार देणारं असतं, मग ते तो मैदानावर असेल किंवा मैदानाबाहेर, असं म्हटलं. यामुळं कोच आणि संस्थेची निवड समजूतदारपणे करावी, असं गांगुलीनं म्हटलं. गांगुलीने कोणाचं नाव या ट्विटमध्ये घेतलेलं नाही. मात्र एकीकडे गौतम गंभीरचे नाव प्रशिक्षक पदासाठी नक्की मानल जात असतानाच दुसरीकडे गांगुलीने थेट ट्विट केल्याने चर्चाना उधाण आलं आहे. गंभीरच्या नियुक्तीला सौरव गांगुलीचा विरोध आहे का? असा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

गंभीरची नियुक्ती जवळपास ठरलीये –

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी गौतम गंभीरचीच निवड नक्की मानली जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा आणि गौतम गंभीर यांच्यात याबाबत चर्चा झाली. या चर्चेनंतर गंभीरने प्रशिक्षक पदासाठी होकार दिला असलयाचे बोललं जात आहे. रिपोर्टनुसार, आयपीएल 2024 च्या फायनलनंतर जय शाह आणि गौतम गंभीर यांच्यात प्रशिक्षक पदाबाबत चर्चा झाली. या चर्चेत जय शाह गंभीरला म्हणाले, आता आपल्याला देशासाठी हे करायचे आहे. गौतम गंभीर हा त्याच्या देशभक्तीसाठी ओळखला जातो. त्यांनी अनेक प्रसंगी आपले मत स्पष्टपणे मांडले आहे. यामुळेच त्याने जय शाहचे म्हणणे मान्य केले असून आता तो टीम इंडियात राहुल द्रविडची जागा घेण्यास सज्ज असल्याचे बोललं जात आहे.

गौतम गंभीर भारताच्या लोकप्रिय खेळाडूंमध्ये गणला जातो. २००७ च्या T20 वर्ल्डकप आणि २०११ च्या ५० षटकांच्या विश्वचषक स्पर्धेत अंतिम सामन्यात गंभीरनेच दमदार खेळ्या करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला होता. गंभीरकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा तगडा अनुभव आहे. त्याशिवाय मेंटॉर म्हणूनही त्यानं यशस्वी काम केले आहे. यंदाच्या आयपीएल मध्ये कोलकाता नाईट रायडर्सला चॅम्पियन बनवण्यात गंभीरचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे गौतम गंभीरच भारताचा मुख्य प्रशिक्षक व्हावा अशी . बीसीसीआयची इच्छा होती.