Savitrbai Phule Scholarship Scheme | आपले सरकार हे नेहमीच समाजातील वेगवेगळ्या घटकांचा विचार करून योजना आणत असतात. त्यातही स्त्रियांना आणि मुलींना केंद्रस्थानी ठेवून अनेक योजना आणत असतात. सरकार हे शाळेत शिकणाऱ्या मुलींना शिष्यवृत्ती देत असतात. परंतु आता या शिष्यवृत्ती बाबत एक सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आता मुलांना मुलींना मिळणारी शिष्यवृत्ती वाढ होणार आहे. इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंत शिकणाऱ्या मुलींच्या शिष्यवृत्तीमध्ये वाढ होणार आहे. आता या मुलींना सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत मिळणाऱ्या येणार आहे.
सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती योजनेतून (Savitrbai Phule Scholarship Scheme) दिली जाणारी शिष्यवृत्ती ही राज्य शासनाच्या मागास बहुजन कल्याण विभाग महाराष्ट्र राज्य विभाग अंतर्गत दिली जाते. याआधी मागास प्रवर्गातील इयत्ता पाचवी ते सातवी पर्यंतच्या मुलींना 60 रुपये दिले जात होते. परंतु आता ती रक्कम 250 रुपये प्रति महिना एवढी करण्यात आलेली. आहे तसेच आठवी ते दहावी दरम्यान शिक्षण घेणाऱ्या मुलींना दर महिन्याला 100 रुपये शिष्यवृत्ती दिली जात होती ती आता 300 रुपये एवढी झालेली आहे. त्यामुळे आता विद्यार्थिनींसाठी ही एक खूप आनंदाची बातमी.
तुम्हाला देखील जर या सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती (Savitrbai Phule Scholarship Scheme) योजनेचा लाभ घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला शाळेतील मुख्याध्यापकांची संपर्क साधावा लागेल. त्यानंतर जिल्हाच्या संबंधित प्रादेशिक उपसंचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाशी देखील संपर्क साधावा लागेल. त्यानंतर तुम्हाला या योजनेचा अर्ज करून त्याचा लाभ घेता येईल. शिक्षणामध्ये मुलींचे प्रमाण वाढावे आणि त्यांना चांगल्या प्रकारे शिक्षण घेता यावे. यासाठी सरकारने ही योजना आणलेली आहे. आणि आता त्या योजनेमध्ये बदल करून मिळणारे रक्कम देखील वाढवली आहे.