औरंगाबाद : 50 हजार रुपये हुंडा दिल्यानंतर ही मुलगी पसंत नाही सांगत अजून एक लाख रुपये हुंडा द्या म्हणत लग्न मोडल्याची घटना मुकुंदवाडी परिसरात घडली आहे. या प्रकरणी नवदेव आणि त्याच्या कुटुंबाविरुद्ध मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सागर बाबुराव कोंगळे, बाबुराव कोंगळे, सागरची आई आणि दोन बहिणी यांचा आरोपींमध्ये समावेश आहे पीडितेचे वडील तिच्यासाठी स्थळ शोधत असताना एकाच वसाहतीत राहणाऱ्या सागरच्या वडिलांना त्यांची विचारणा केली. सागर इंजिनिअर असून तो खाजगी कंपनीत नोकरी करतो. त्याच्यात प्राथमिक होकार झाल्यानंतर बोलणी सुरू झाली. लग्न खर्चासाठी 80 हजार रुपये रोकड, लग्नात कपडे, भांडे आणि जेवणाची व्यवस्था, मंगल कार्यालयात लग्न लावून देण्याची मागणी सागरच्या कुटुंबांनी आणि नातेवाईकांनी केली. 29 नोव्हेंबर 2020 रोजी दोन्हीकडील नातेवाईकांच्या उपस्थितीत साखरपुडा झाला. तेव्हा सागरला 38 हजार 500 रुपयांची अंगठी आणि कपडे देण्यात आले. 16 एप्रिल 2021 ही लग्नाची तारीख ठरली परंतु लागल्याने लग्नाची तारीख 7 जून ठरविण्यात आली.
दरम्यान, लग्नाचा खर्च म्हणून 50 हजार रुपये देण्यात आले उरलेले तीस हजार रुपये लग्नाच्या आठ दिवसा आधी देऊ, असे कबूल केले. 20 मे रोजी तरुणीचा वाढदिवस असल्याने सागर आणि त्यांचे त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांची मुलगी पसंत नाही आणखीन एक लाख रुपये द्या, नसता हे लग्न मोडले असे समजा असे त्यांनी धमकावले. मुलीचे वडील हातपाय पडले. मात्र त्याने काहीही ऐकले नाही अखेर याप्रकरणी मुकुंदवाडी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.