‘या’ दोन बँकांच्या 3 वर्षांच्या FD वर मिळणार बेस्ट व्याजदर ; जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गुंतवणूकदार फिक्स डिपॉझिट (FD) गुंतवणुकीसाठी सरकारी बँका सर्वाधिक सुरक्षित मानल्या जातात. निश्चित परताव्यामुळे अनेक गुंतवणूकदार FD ला प्राधान्य देताना दिसत आहेत. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आणि पंजाब नॅशनल बँक (PNB) या देशातील प्रमुख सरकारी बँका आहेत. हे ग्राहकांना नेहमी चांगल्या सेवा देत असतात, त्यामुळे ग्राहकांचा त्यांच्यावर अधिक विश्वास आहे. या दोन्ही बँकांच्या 3 वर्षांच्या FD योजनांमध्ये व्याजदर कसे आहेत , हे आज आपण पाहणार आहोत .

SBI आणि PNB FD व्याजदर

SBI मध्ये 3 ते 5 वर्षांच्या कालावधीसाठी FD योजना उपलब्ध असून, सामान्य नागरिकांना 6.75% आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.25% व्याजदर मिळतो. याउलट PNB 2 ते 3 वर्षांच्या FD वर सामान्य नागरिकांसाठी 7%, ज्येष्ठ नागरिकांसाठी 7.50%, तर सुपर ज्येष्ठ नागरिकांसाठी (80 वर्षांपेक्षा जास्त वय) 7.80% इतका परतावा देते. त्यामुळे गुंतवणूकदार या बँकांकडे आकर्षित होताना दिसतात.

1000 पासून FD उघडता येते

SBI आणि PNB या दोन्ही बँकांमध्ये किमान 1000 पासून FD उघडता येते. पण PNB च्या FD योजनांमध्ये सर्व विभागातील नागरिकांसाठी जास्तीत जास्त व्याजदर मिळतो. त्यामुळे गुंतवणूकदारांसाठी PNB हा अधिक लाभदायक पर्याय ठरतो. FD योजनांमध्ये वेळेआधी पैसे काढल्यास दोन्ही बँकांकडून प्री मेच्युरिटी पेनल्टी शुल्क लागू होऊ शकते. त्यामुळे दीर्घकालीन गुंतवणूक करताना काळजीपूर्वक निर्णय घेणे महत्त्वाचे आहे. आपले आर्थिक उद्दिष्ट आणि परताव्याची अपेक्षा यानुसार योग्य FD योजना निवडावी.

गुंतवणूक करून चांगला नफा

PNB च्या 3 वर्षांच्या FD योजना व्याजदराच्या बाबतीत SBI पेक्षा सरस आहेत. पण SBI ची विश्वासार्हता आणि देशभरातील मोठे नेटवर्कही विचारात घेण्यासारखे आहे. अधिक नफ्यासाठी PNB तर विश्वासार्ह सेवेसाठी SBI पर्याय निवडता येईल. आपल्या आर्थिक गरजेनुसार योग्य पर्याय निवडून सुरक्षित गुंतवणूक करून चांगला नफा मिळावा.