हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । देशातील सर्वात प्रसिद्ध बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI चे देशभरात तब्बल ४५ कोटींपेक्षा अधिक ग्राहक आहेत. मात्र आता याच ग्राहकांना बँकेने मोठा जोर का झटका दिला आहे. बँकेने डेबिट कार्ड मेंटेनेंस शुल्कात वाढ (SBI Debit Card Charges) करण्याचा निर्णय घेतला आहे. हि वाढ तब्बल ७५ रुपयांनी करण्यात आली आहे. येत्या १ एप्रिल पासून हा नवीन निर्णय लागू करण्यात येणार असून यामुळे ग्राहकांच्या खिशाला मात्र चांगलाच चाप बसला आहे. डेबिट कार्ड बदलणे, डुप्लिकेट पिन आणि आंतरराष्ट्रीय व्यवहार यासारख्या सुविधांसाठीही बँकेला पैसे द्यावे लागतात. सध्या कोणत्या प्रकारच्या डेबिट कार्डचे शुल्क वाढवण्यात आले आहेत याची माहितीही स्टेट बँक ऑफ इंडियाने दिली आहे.
कोणत्या कार्डवर किती रुपये चार्जेस – SBI Debit Card Charges
क्लासिक डेबिट कार्ड-
पूर्वी क्लासिक-सिल्व्हर-ग्लोबल-कॉन्टाक्लास डेबिट कार्डसाठी 125 रुपये लागत होते, आता त्याची किंमत 200 रुपये असेल.
युवा डेबिट कार्ड –
युवा-गोल्ड-कॉम्बो डेबिट कार्ड-माय कार्डसाठी, आधी तुम्हाला 175 रुपये मोजावे लागत होते, मात्र आता बँकेच्या नव्या नियमानुसार आता ग्राहकांना यासाठी 250 रुपये द्यावे लागतील.
प्लॅटिनम डेबिट कार्ड-
प्लॅटिनम डेबिट कार्डसाठी, तुम्हाला 250 रुपयांऐवजी आता 325 रुपये भरावे लागतील.
बिझनेस डेबिट कार्ड-
प्राइड-प्लॅटिनम बिझनेस डेबिट कार्डसाठी, तुम्हाला 350 रुपयांऐवजी 425 रुपये मोजावे लागतील.
इतर शुल्क
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या इतर काही चार्जेस बद्दल सांगायचं झाल्यास, डेबिट कार्ड (SBI Debit Card Charges) बदलण्यासाठी 300 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. तुम्हाला जर डुप्लिकेट पिन तयार करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा 50 रुपये अधिक जीएसटी भरावा लागेल. . एटीएममधून पैसे काढण्यावर किमान 100 रुपये आणि 3.5 रुपये जीएसटी आकारला जातो.