SBI Educational Loan : विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी; SBI देतेय कोणत्याही हमीशिवाय 50 लाख रुपयांचं कर्ज

SBI Educational Loan
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI Educational Loan – शिक्षण एवढे महाग झाले आहे कि , कर्ज घेण्याशिवाय पालकांकडे कोणताही पर्याय उरत नाही . तसेच अनेक पालकांना आपल्या मुलांचे शिक्षण परदेशात व्हावे असे वाटत असते. पण आर्थिक अडचणीमुळे ते शक्य होत नाही . जर तुम्ही परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करत असाल , तर हि आनंदाची बातमी तुमच्यासाठी महत्वाची ठरणार आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी उपलब्ध करून दिली आहे. SBI ग्लोबल एड-व्हँटेज योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना कोणत्याही हमीशिवाय 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते. तसेच, निवडक प्रकरणांमध्ये 3 कोटी रुपयांपर्यंतचे शैक्षणिक कर्ज देण्याची सुविधाही आहे. तर चला या कर्जाबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.

बँकेकडून 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज (SBI Educational Loan)-

शैक्षणिक कर्जाची वैशिष्ट्ये विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी उपयुक्त आहेत. कोणत्याही हमीशिवाय, विद्यार्थी परदेशातील चांगल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यावर बँक 50 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज देऊ शकते . या कर्जामध्ये विद्यार्थ्याच्या पूर्ण शैक्षणिक खर्चाचा समावेश असतो, ज्यात ट्यूशन फी, पुस्तके, वसतिगृह खर्च, संगणक आणि इतर आवश्यक शिक्षण सामग्रीचा समावेश आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण घेत असताना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत नाही, आणि ते त्यांच्या शैक्षणिक ध्येयावर लक्ष केंद्रित करू शकतात.

कर्जाच्या परतफेडीसाठी जास्त कालावधी उपलब्ध –

शैक्षणिक कर्जाच्या परतफेडीसाठी दीर्घकालीन कालावधी दिला जातो, ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक क्षमतेनुसार कर्ज परत करण्याची सुविधा मिळते. विद्यार्थ्यांना 15 वर्षांपर्यंत कर्जाची परतफेड करण्यासाठी वेळ भेटतो , ज्यामुळे कर्जाची मुदत दीर्घकालीन बनवली जाते आणि परतफेडीचा भार कमी होतो. याशिवाय शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कर सवलतही मिळते. आयकर कायद्यातील कलम 80 (E) अंतर्गत शैक्षणिक कर्जावर भरलेल्या व्याजावर कर सवलत मिळवता येते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आर्थिक ओझे आणखी हलके होते.

शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर –

शैक्षणिक कर्ज घेण्यासाठी विविध बॅंका आणि वित्तीय संस्थांनी वेगवेगळ्या व्याजदरांची घोषणा केली आहे. सामान्य शैक्षणिक कर्जासाठी व्याजदर 11.15% पर्यंत आहे. SBI च्या स्कॉलर लोन योजनेत (SBI Educational Loan), विशेषतः IIT आणि इतर प्रतिष्ठित संस्थांमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी, व्याजदर 8.05% ते 9.65% दरम्यान असतो, जो इतर कर्जांपेक्षा कमी आहे. त्याचप्रमाणे, ग्लोबल एड-व्हँटेज कर्जासाठी 10.15% व्याजदर द्यावा लागतो .

कर्जासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया (Loan Application)

शैक्षणिक कर्जासाठी अर्ज (Loan Application) करण्याची प्रक्रिया एकदम सोपी आहे. विद्यार्थ्यांना बँकेच्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन ऑनलाइन अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे. तसेच, त्यांना जवळच्या SBI शाखेत जाऊन प्रत्यक्ष अर्ज सादर करण्याचीही संधी आहे. अर्ज प्रक्रियेच्या दरम्यान, काही आवश्यक कागदपत्रांची आवश्यकता असते, जसे की ओळख आणि पत्त्याचा पुरावा, शैक्षणिक दस्तऐवज, उत्पन्नाचा पुरावा, फोटो, पॅन कार्ड, व्हिजा संबंधित कागदपत्रे, SOP आणि इंग्रजी प्रवीणता चाचणीचे गुणपत्रक. या कागदपत्रांच्या आधारावर बँक कर्जासाठी अर्ज प्रक्रिया पूर्ण करणार आहे, आणि विद्यार्थ्यांना कर्ज मिळविण्यासाठी योग्य मार्गदर्शन करेल.

कोणत्या देशांमध्ये कर्ज लागू –

एसबीआयने कर्जाची सुविधा यूएसए, ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, जपान, जर्मनी, फ्रान्स, आयर्लंड आणि स्वित्झर्लंडसह अनेक देशांतील विद्यापीठांसाठी दिली आहे. परदेशातील उच्च शिक्षणासाठी SBI ग्लोबल एड-व्हँटेज योजना विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते.