SBI कडून कर्ज घेणे महागले, बँकेने व्याजदरात केली 0.15 टक्क्यांनी वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI : RBI ने रेपो दरात वाढ केली आहे. ज्यानंतर आता जवळपास सर्वच बँकांकडून आपल्या कर्जावरील व्याजदरात वाढ करण्यास सुरुवात झाली आहे. आता यामध्ये SBI चेही नाव सामील झाले आहे. ग्राहकांना मोठा धक्का देत या बँकेने विविध कालावधीसाठीच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. यामुळे आता बँकेकडून कर्ज घेणे महागणार आहे. बँकेचे नवीन दर 15 नोव्हेंबर 2022 पासून लागू होतील.

SBI special fixed deposit scheme for senior citizens 'SBI WeCare' extended for third time till June 30

SBI ने एक महिना आणि तीन महिन्यांच्या MCLR मध्ये 0.15 टक्क्यांनी वाढ केली आहे. या वाढीसह, या दोन्ही कालावधीसाठी MCLR मध्ये 7.75 टक्क्यांवर गेला आहे. यापूर्वी याच कालावधीसाठीचा MCLR 7.60 टक्क्यांवर होता. त्याच वेळी, बँकेने सहा महिन्यांचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढवून 8.05 टक्के केला आहे, जो 7.90 टक्के होता. बँकेने ओव्हरनाईटच्या MCLR मध्ये कोणताही बदल केलेला नाही.

त्याचप्रमाणे, 2 वर्षांचा आणि 3 वर्षांच्या MCLR मध्ये आता 0.10 टक्क्यांनी वाढ केली आहे. जो आता 8.25 टक्के आणि 8.35 टक्के झाला आहे. SBI ने एका अधिसूचनेत ही माहिती दिली आहे. आता एक महिना आणि तीन महिन्यांचा MCLR अनुक्रमे 0.15 टक्क्यांनी वाढून 7.75 टक्के झाला आहे. तसेच सहा महिन्यांचा MCLR 0.15 टक्क्यांनी वाढून 8.05 टक्क्यांवर पोहोचला आहे.

SBI, HDFC hike interest rates for fixed deposits. Check latest rates here - Hindustan Times

जास्त EMI द्यावा लागणार

MCLR मध्ये वाढ झाल्याने आता टर्म लोन वरील EMI वाढण्याची अपेक्षा आहे. बहुतेक ग्राहक कर्जे ही एका वर्षाच्या मार्जिनल कॉस्ट बेस्ड लेंडिंग रेटवर आधारित असतात. अशा परिस्थितीत, MCLR वाढल्यामुळे पर्सनल, ऑटो आणि होम लोन महागतील.

MCLR काय असते ???

MCLR ही RBI ने विकसित केलेली एक पद्धत आहे ज्या आधारावर बँकांकडून कर्जाचा व्याजदर ठरवला जातो. या आधी सर्व बँका बेस रेटच्या आधारे ग्राहकांसाठीचे व्याजदर निश्चित करत असत. SBI

RBI hiked repo rate by 50 bps to 5.40% to counter inflation |

RBI ने रेपो दरात केली वाढ

अलीकडेच, RBI ने आपल्या द्वि-मासिक पतधोरण आढाव्यात रेपो दर 0.5 टक्क्यांनी वाढवून 5.9 टक्क्यांवर नेला. हा त्याचा 3 वर्षाचा उच्चांक आहे. किरकोळ चलनवाढीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि विविध देशांच्या मध्यवर्ती बँकांकडून आक्रमक दरवाढीमुळे निर्माण होणाऱ्या दबावाला तोंड देण्यासाठी RBI कडून हे पाऊल उचलण्यात आले आहे. SBI

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.bankofbaroda.in/interest-rate-and-service-charges/retail-loans-interest-rates

हे पण वाचा :
Multibagger Stock : गेल्या काही वर्षांत 200% जास्त रिटर्न देऊन ‘या’ शेअर्सने गुंतवणूदारांना केले मालामाल !!!
Canara Bank ग्राहकांसाठी आनंदाची बातमी !!! ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार 7.5% व्याज
Bank FD : ‘या’ 102 वर्ष जुन्या बँकेकडून FD वरील व्याजदरात वाढ, नवीन व्याज दर तपासा
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या दरात किंचित वाढ, नवीन दर पहा
Whatsapp Banking : घरबसल्या आपल्या बँकेशी संबंधित सर्व माहिती मिळवण्यासाठी ‘Save’ करा ‘हे’ नंबर