हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| स्टेट बँक ऑफ इंडियाने (State Bank Of India) आज आपल्या ग्राहकांना एक मोठा झटका दिला आहे. या बँकेने त्यांच्या मार्जिन कॉस्ट ऑफ फंड्सवरील कर्जाच्या दरांमध्ये (MCLR) मध्ये 10 बेसिस पॉइंटची वाढ केली आहे. ही वाढ आता काही ठराविक टेन्योरच्या एमसीएलआरवर लागू असणार आहे. महत्वाचे म्हणजे, आजपासून बँकेने कर्जदरात वाढ केल्यामुळे गृहकर्ज, वाहन कर्ज आणि MCLR शी संबंधित इतर कर्जांचा EMI वाढणार आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, बँकेने आपल्या MCLR (मार्जिनल कॉस्ट ऑफ लेंडिंग रेट्स) मध्ये बदल केले आहेत. या बदलाअंतर्गत, MCLR हा 5 ते 10 अंकांनी वाढवण्यात आला आहे. याचाच अर्थ MCLR 0.05 टक्क्यांवरून 0.10 टक्के झाला आहे. SBI ने MCLR मध्ये वाढ केल्यामुळे विविध कर्ज उत्पादने महाग होणार आहेत. यामुळे लाखो ग्राहकांवर व्याजाचा बोजा वाढेल. तसेच त्यांना जास्त ईएमआय भरावा लागेल.
दरम्यान, SBI ने एका महिन्याच्या MCLR बेंचमार्कवर आधारित व्याजदर 5 बेस पॉईंट्सनी 8.35 टक्क्यांनी वाढवला आहे. तर 3 महिन्यांच्या MCLR बेंचमार्कवर आधारित व्याजदर 10 बेस पॉइंट्सने 8.40 टक्क्यांनी वाढवला आहे. याशिवाय 6 महिने, एक वर्ष आणि 2 वर्षांसाठी MCLR वर आधारित व्याजदरातही प्रत्येकी 10 बेस पॉईंटने वाढ केली आहे. या वाढीनंतर 6 महिन्यांसाठी MCLR वर आधारित व्याजदर 8.75 टक्के एका वर्षासाठी 8.85 टक्के आणि 2 वर्षांसाठी 8.95 टक्के झाला आहे.