SBI कडून आता WhatsApp वरच मिळणार पेन्शन स्लिप, जाणून घ्या कसे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । देशातील सर्वात मोठी सरकारी बँक असलेल्या SBI कडून ग्राहकांसाठी अनेक प्रकारच्या सुविधा दिल्या जातात. आताही एसबीआयने ज्येष्ठ नागरिकांसाठी WhatsApp पद्वारे पेन्शन स्लिप पाठवण्याची घोषणा केली आहे. याबाबत एसबीआयने सांगितले की,” ही एक नवीन सुविधा आहे. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना बँकेच्या क्रमांकावर फक्त “HI” असे लिहून पाठवावे लागेल.

SBI WhatsApp Banking Services; Here's How to Avail These

आजकाल जवळपास सर्वच बँकांकडून ग्राहकांच्या सोयीसाठी WhatsApp Banking सुरु केले आहे. याद्वारे ग्राहकांना त्यांना हव्या असलेल्या सुविधेविषयीची माहिती मोबाईलवरच उपलब्ध होते. SBI ने देखील काही कालवडीपूर्वीच WhatsApp सर्व्हिस सुरू केली आहे. याचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना सर्वांत आधी SBI चे इंटरनेट बँकिंग किंवा SBI च्या YONO App द्वारे रजिस्ट्रेशन करावे लागेल. चला तर मग त्यासाठीची संपूर्ण प्रक्रिया इथे जाणून घेऊयात…

SBI Banking Services: अब WhatsApp पर भी पा सकते हैं Pension Slip, एसबीआई  ग्राहकों को मिली सुविधा, जानिए क्या है प्रोसेस

अशा प्रकारे सुरू करा SBI WhatsApp सर्व्हिस

ही सर्व्हिस सुरू करण्यासाठी सर्वांत आधी बँकेच्या WhatsApp नंबर +919022690226 वर “HI” असे लिहून पाठवावे लागेल. त्यानंतर रजिस्ट्रेशन पूर्ण होईल. यानंतर WhatsApp वर बँकेकडून मेसेज मिळू लागतील. यामध्ये दिलेल्या पर्यायातून बॅलन्स इन्क्वायरी, मिनी स्टेटमेंट आणि पेन्शन स्लिपचा पर्याय निवडावा लागेल. यानंतर आपल्याला हव्या असलेल्या महिन्याच्या स्लिपबाबतची माहिती सांगा. ही प्रक्रिया पूर्ण होताच. WhatsApp वर स्लिप मिळेल.

SBI launches WhatsApp Banking Services to make banking easier for its  customers |

आता WhatsApp वर मिळणार मिनी स्टेटमेंट

एसबीआय कडून ग्राहकांना WhatsApp द्वारे बँक बॅलन्स तपासण्याची सुविधा मिळत आहे. याबरोबरच मिनी स्टेटमेंट साठी देखील रिक्वेस्ट पाठवता येईल. मात्र, WhatsApp वरील बँकिंग सुविधेचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना आधी रजिस्ट्रेशन करावे लागेल.

SBI Scam Fake Message for PAN Card Details for reactivating SBI YONO  account dangerous scam beware | SBI के नाम से आने वाले इस मैसेज से रहें  सावधान! रिप्लाई करना पड़ सकता

अशा प्रकारे करा रजिस्ट्रेशन

यासाठी सर्वांत आधी SBI ऑनलाइनमध्ये साइन इन करा. यानंतर, रिक्वेस्ट आणि इन्क्वायरीच्या पर्यायावर जा. यानंतर, ऑनलाइन रजिस्ट्रेशनचा ​​पर्याय निवडा. त्यानंतर खाते क्रमांक निवडा. त्यावर नॉमिनीची माहिती भरा आणि सबमिट करा.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://sbi.co.in/web/personal-banking/digital/whatsapp-banking

हे पण वाचा :
Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत आज झाला बदल, जाणून घ्या नवीन दर
LIC च्या ‘या’ पॉलिसीमध्ये गुंतवणुक करून मिळवा दुप्पट बोनस !!!
BSNL च्या ‘या’ प्लॅनमध्ये 400 दिवसांच्या व्हॅलिडिटी सोबत मिळवा 750GB डेटा
Post Office च्या ‘या’ योजनेमध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न, कसे ते जाणून घ्या
Bank Of Baroda कडून FD वर मिळणार 7.80% पर्यंत व्याज, याचा लाभ कसा घ्यावा ते पहा