परीक्षेशिवाय नोकरीची संधी; SBI मध्ये बंपर भरती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बँकेत नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने तब्बल 868 जागांसाठी भरती जाहीर केली आहे. बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर या पदासाठी ही भरती जाहीर झाली आहे. विशेष म्हणजे यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही तर थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची थेट निवड केली जाणार आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2023 आहे.

संस्था – स्टेट बँक ऑफ इंडिया

एकूण पदसंख्या – 868

भरले जाणारे पद – बिझनेस करस्पॉन्डंट फॅसिलिटेटर

अर्ज करण्याची पध्दत – ऑनलाईन

अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 मार्च 2023

आवश्यक शैक्षणिक पात्रता –

SBI मधून निवृत्त अधिकारी असलेले उमेदवारच या भरतीसाठी अर्ज करू शकतात.

वय मर्यादा –

उमेदवारांचे वय 65 वर्षांपेक्षा जास्त नसावे.

निवड प्रक्रिया

उमेदवारांना कोणतीही लेखी परीक्षा द्यावी लागणार नाही, थेट मुलाखतीद्वारे निवड केली जाईल.

असा करा अर्ज

नोंदणी करण्यासाठी, प्रथम अधिकृत वेबसाइट https://www.sbi.co.in/careers वर जा.
वेबसाइटच्या होमपेजवर स्वतःची नोंदणी करा.
नोंदणी केल्यानंतर, अर्ज भरा आणि सबमिट करा.

अधिक माहितीसाठी जाहिरात पहा – PDF

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे CLICK करा – APPLY

अधिकृत वेबसाइट – sbi.co.in