हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| सध्या तुम्ही नोकरीच्या शोधात आहात का? तुम्हाला एका चांगल्या बँकेत नोकरी करायची आहे का? तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण की, स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (State Bank of India) ट्रेड फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेतंर्गत अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 जून 2024 आहे. त्यामुळे क्षणाचाही विलंब न करता इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी त्वरीत अर्ज करावा. तसेच शैक्षणिक पात्रता आणि इतर माहिती जाणून घ्यावी.
शैक्षणिक पात्रता काय??
मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत फायनान्स ऑफिसरच्या एकूण 150 जागा भरल्या जाणार आहेत. या रिक्त जागांवर काम करून ठेवणाऱ्या तरुणांनी येत्या 27 जून 2024 पर्यंत अर्ज करावेत. भरती प्रक्रियेच्या शैक्षणिक पात्रतेनुसार, अर्ज करणाऱ्या उमेदवाराने मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी घेतलेली असावी. यासह अर्जदार उमेदवाराकडे आयआयबीएफने दिलेले फॉरेक्समधील प्रमाणपत्र असायला हवे.
वयोमर्यादा आणि अर्ज शुल्क किती??
लक्षात घ्या की भरती प्रक्रियेत वयोमर्यादेची अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित उमेदवाराचे वय 23 ते 32 दरम्यान असायला हवे. यात प्रवर्गातील उमेदवारांना वयाच्या अटीत सूट देण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेअंतर्गत अर्ज केलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल. प्रथम अर्ज सादर केलेल्या उमेदवारांचे शॉर्टलिस्टिंग होईल. महत्वाचे म्हणजे रिक्त जागांसाठी 750 रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. पर्यंत प्रवर्गातील उमेदवारांना शुल्क भरावे लागणार नाही. या भरती संबंधित माहिती स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाईटवर ही देण्यात आली आहे.