SBI Recruitment : SBI मध्ये 2 हजार पदांची भरती, जाणून घ्या पात्रता आणि अर्जाची अंतिम तारीख

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरी (SBI Recruitment) करणाऱ्यांसाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआय बँककडून PO म्हणजेच Probationary Officer पदांसाठीची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदासाठी एसबीआय बँकेत 2000 पेक्षा जास्त उमेदवारांची भरती करण्यात येणार आहे. आज पासून म्हणजेच 7 सप्टेंबर पासून उमेदवार या पदाचा अर्ज भरू शकतात. एसबीआयच्या sbi.co.in या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. अर्ज भरण्याची शेवटची तारीख 27 सप्टेंबर अशी आहे.

शिक्षण-

एसबीआय बँकने Probationary Officer 2000 रिक्त पदासाठीच्या भरतीची जाहिरात (SBI Recruitment) प्रसिद्ध केली आहे. अर्ज केलेल्या उमेदवारांची येत्या नोव्हेंबर महिन्यात SBI ची प्रिलिम परीक्षा घेतली जाईल. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवीधर पदवी घेतली असावी. जय विद्यार्थी अंतिम वर्षात शिकत आहेत त्या उमेदवारांना देखील या पदासाठी अर्ज करता येऊ शकतो. परंतु या उमेदवारांना 31 डिसेंबरपर्यंत पदवी प्रमाणपत्र सादर करावे लागेल.

वयोमर्यादा-

Probationary Officer पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांची वयोमर्यादा एप्रिल २०२३ रोजी २१ वर्षे ते ३० वर्षे दरम्यान असावी. या वयोमर्यादेच्या पुढील उमेदवारांना पदासाठी अर्ज करता येणार नाही. परंतु काही शासकीय नियमानुसार श्रेणीनिहाय वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

अर्ज प्रक्रिया आणि शुल्क- SBI Recruitment

7 सप्टेंबर पासून एसबीआय पीओ पदासाठी उमेदवारांना अर्ज करता येऊ शकतो. 27 सप्टेंबर पर्यंत उमेदवार या रिक्त पदांसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक उमेदवार https://sbi.co.in/documents/77530/36548767/060923-1_detailed+Advt.+English+PO+23-24_07.09.2023.pdf/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकतात. अर्ज भरत्यावेळी EWS/OBC प्रवर्गातील उमेदवारांना अर्ज शुल्क म्हणून रु. ७५० भरावे लागतील. परंतु SC/ST/PWBD उमेदवारांसाठी कोणतेही अर्ज शुल्क आकारले जाणार नाही.

परिक्षा प्रक्रिया

SBI PO नोकरी मिळवण्यासाठी उमेदवारांना सर्वात प्रथम प्रिलिम्स परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर त्यांची मुख्य परीक्षा घेतली जाईल. या मुख्य परीक्षेत पास झालेल्या उमेदवारांना सायकोमेट्रिक चाचणी, ग्रुप एक्सरसाइज आणि मुलाखतीसाठी बोलावले जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया झाल्यानंतर उत्तीर्ण उमेदवारांची निवड पदासाठी केली जाईल.