स्टेट बँकेच्या या निर्णयाने गृह आणि वाहन कर्ज लवकरच स्वस्त होणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

टीम, HELLO महाराष्ट्र । देशातील सर्वात मोठी बँक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया नव्या ग्राहकांसाठी खुशखबर देणारा निर्णय घेतला आहे. एसबीआयच्या एमसीएलआरशी संबंधित असलेली गृह, वाहन आणि अन्य कर्ज स्वस्त होणार आहेत.  नुकताच रिझर्व्ह बँकेने पतधोरणात व्याजदर स्थिर ठेवले होते. त्यानंतर व्याजदरात बदल करणारी ‘एसबीआय’ पहिली बँक ठरली आहे. या व्याजदर कपातीनंतर एक वर्षासाठीचा एमसीएलआर आता ८ टक्क्यावरून ७. ९० टक्के झाला आहे.स्टेट बँक ऑफ इंडियाने मार्जिनल कॉस्ट ऑफ फंडवर आधारीत एमसीएलआरच्या कर्ज दरात ०.१० टक्क्यांनी कपात केल्यानं कर्जामध्ये सवलत मिळणार आहे. १० डिसेंबरपासून नवीन दर लागू होणार आहेत.

दरम्यान चालू आर्थिक वर्षातील एमसीएलआरमधील ही सलग आठवी कपात आहे. एसबीआय देशातील स्वस्तात कर्ज पुरवठा करणारी बँक असून एमसीएलआरच्या कपातीमागे ग्राहकांना फायदा पोहोचवण्याच्या उद्देश असल्याचे एसबीआयने जारी केलेल्या पत्रकात म्हटले आहे. मागच्या आठवडयात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने रेपो तसेच रिव्हर्स रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने रेपो दर ५.१५ टक्के तर रिव्हर्स रेपो रेट ४.९० टक्के कायम ठेवला आहे. दरम्यान कर्जावर किती व्याज आकारायचे, त्याचा दर किती असावा यासाठी एक प्रणाली बँकांमध्ये कार्यरत असते. त्यालाच एमसीएलआर असे म्हटले जाते.

Leave a Comment