SBI Salary Account Benefits : स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ही देशातील सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीची बँक आहे, ही बँक सर्वसमावेशक बँकिंग चा पर्याय आपल्या ग्राहकांकरिता उपलब्ध करून देते. SBI सॅलरी पॅकेज अकाउंट ची देखील उत्तम सुविधा देते. हे खाते खास पगारदार वर्गासाठी डिझाइन केले आहे, ज्यामध्ये विनामूल्य एटीएम वापर, विमा संरक्षण आणि अनेक प्रकारच्या आर्थिक सेवांसह इतर अनेक फायदे देखील ग्राहकांना पुरवले (SBI Salary Account Benefits) जातात. चला तर मग जाणून घेऊया…
मोफत ATM वापर सुविधा (SBI Salary Account Benefits)
एसबीआयच्या सॅलरी पॅकेज अकाउंट मध्ये तुम्हाला फ्री मध्ये ATMची फॅसिलिटी दिली जाते. ATM होल्डर अनलिमिटेड फ्री ट्रांजेक्शन या एटीएम च्या माध्यमातून करू शकतो. त्यामुळे तुम्हाला जे ॲडिशनल चार्जेस लावले जातात ते लागत नाहीत.
दुर्घटना विमा कव्हरेज
ज्या व्यक्तींचे एसबीआय मध्ये सॅलरी अकाउंट आहे त्या व्यक्ती एक्सीडेंट इन्शुरन्स कव्हरेज घेऊ शकतात. या सुविधेमध्ये आकस्मित मृत्यू किंवा अपंगत्व स्थितीमध्ये तुम्हाला फायनान्शिअल सिक्युरिटी मिळते. कवरेची रक्कम अकाउंट च्या प्रकारानुसार (SBI Salary Account Benefits) असते तसेच तुम्हाला सॅलरी किती मिळते यावर देखील अवलंबून असते. एसबीआय ची ही फॅसिलिटी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना सुरक्षितता देते.
जास्त पैसे काढण्याची फॅसिलिटी (SBI Salary Account Benefits)
SBI सॅलरी पॅकेज खाते अनेकदा ओव्हरड्राफ्ट सुविधेसह येते, ज्यामुळे खातेधारकांना त्यांच्या खात्यातील शिल्लक रकमेपेक्षा जास्त रक्कम एका विशिष्ट मर्यादेपर्यंत मिळू शकते. तात्काळ आर्थिक गरजा किंवा अत्यावश्यक वेळी हे विशेषतः फायदेशीर ठरू शकते, लोकांना त्यांचा रोख प्रवाह प्रभावीपणे व्यवस्थापित करण्यात मदत होते.
इतर विमा फायदे
वैयक्तिक अपघात संरक्षण व्यतिरिक्त, काही SBI पगार पॅकेज खाती आरोग्य विमा किंवा जीवन विमा यासारखे इतर विमा फायदे देखील देऊ शकतात. हे अतिरिक्त कव्हरेज खातेधारकांना आणि त्यांच्या प्रियजनांना सर्वसमावेशक आर्थिक (SBI Salary Account Benefits) सुरक्षा देतात.