हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (SBI Sarvottam Scheme) स्टेट बँक ऑफ इंडिया ही देशातील सर्वात मोठी बँक आहे. भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील या बँकेची ग्राहक संख्या बरीच मोठी आहे. त्यामुळे SBI च्या मार्फत अनेक फायदेशीर योजना राबवल्या जातात. ज्यामध्ये अमृत कलश आणि सर्वोत्तम अशा दोन अत्यंत लोकप्रिय योजना आहेत. या दोन्ही योजना मुदत ठेव योजना असून यातील सर्वोत्तम योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी फायदेशीर आहे. या योजनेत ७.९०% व्याजदर दिला जात आहे. यातून फायदा मिळवायचा असेल तर त्यासाठी काही नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामुळे आज आपण या योजनेविषयी सविस्तर माहिती घेत आहोत.
SBI ची सर्वोत्तम FD योजना (SBI Sarvottam Scheme)
SBI बँकेची सर्वोत्तम योजना ही नावाप्रमाणे सर्वोत्तम आहे. कारण ही योजना पीपीएफ, एनएससी आणि पोस्ट ऑफिसच्या बचत योजनांपेक्षा जास्त व्याज प्रदान करते. ही योजना केवळ १ वर्ष आणि २ वर्ष कालावधीत चांगला निधी तयार करण्यास मदत करते. या योजनेत सामान्य ग्राहकांना २ वर्षांच्या ठेवीवर ७.४% व्याजदर दिला जातो. तर ज्येष्ठ नागरिकांना या योजनेत ७.९०% इतका व्याजदर दिला जातो. तसेच १ वर्षाच्या ठेवीवर सर्वसामान्य ग्राहकांना ७.१०% तर ज्येष्ठ नागरिकांना ७.६०% व्याजदर दिला जातो.
चक्रवाढ व्याजाचा फायदा
या योजनेत ज्येष्ठ नागरिकांसाठी १५ लाख रुपये ते २ कोटी रुपयांच्या वरील १ वर्षीय कालावधीच्या FD वर वार्षिक उत्पन्नासाठी ७.८२% व्याज मिळते. तर २ वर्षांच्या FD साठी ८.१४% उपलब्ध आहेत. (SBI Sarvottam Scheme) २ कोटी ते ५ कोटी रुपयांसारख्या मोठ्या ठेवींवर ज्येष्ठांना १ वर्षासाठी ७.७७% तर २ वर्षांसाठी ७.६१% व्याज उपलब्ध आहे. सर्वोत्तम योजनेत अशाप्रकारे चक्रवाढ व्याज उपलब्ध असल्याचा ग्राहकांना मोठा फायदा होतो.
किती गुंतवणूक करता येईल?
SBI बँकेच्या सर्वोत्तम योजनेत ग्राहकांना किमान १५ लाख रुपये ते कमाल २ कोटी रुपयांची गुंतवणूक करता येते. ही योजना निवृत्त झालेल्या आणि पीएफ फंडात पैसे असलेल्या ग्राहकांसाठी फायदेशीर मानली जाते. (SBI Sarvottam Scheme) या योजनेत २ कोटींपेक्षा जास्त गुंतवणूक करण्याचादेखील पर्याय उपलब्ध आहे. मात्र, यासाठी दिला जाणारा व्याजदर हा ०.०५% कमी आहे.