SBI च्या ‘या’ FD वर जास्त व्याज मिळविण्याची संधी, त्याविषयी जाणून घ्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । SBI  : जर आपल्याला फिक्स्ड डिपॉझिट्समध्ये गुंतवणूक करायची असेल तर आता एक सुवर्ण संधी चालून आली आहे. देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) कडून स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल Utsav Deposit ही खास योजना सुरू करण्यात आली आहे. यामध्ये 75 दिवसांसाठी पैसे जमा करून या योजनेचा लाभ घेता येऊ शकेल. मात्र 28 ऑक्टोबर 2022 पर्यंतच ही ऑफर सुरु असेल.

Good News For Senior Citizens: SBI Extends Special Fixed Deposit Scheme Till March 2022

नुकतेच एसबीआय ने एका ट्विटद्वारे सांगितले की, “आता आपल्या पैशांना आपल्यासाठी कठोर परिश्रम करू द्या. आपल्यासाठी फिक्स्ड डिपॉझिट्सवर जास्त व्याजदरांसह ‘Utsav Deposit’ सादर करत आहोत!” चला तर मग त्याविषयी जाणून घेऊयात …

Utsav Deposit या योजनेचा कालावधी :

15 ऑगस्ट 2022 ते 28 ऑक्टोबर 2022

डिपॉझिट्सचा कालावधी

1000 दिवस

पात्रता

> एनआरओ टर्म डिपॉझिट्ससह देशांतर्गत रिटेल टर्म डिपॉझिट्स (2 कोटींपेक्षा कमी)
>> नवीन आणि रिन्यूअल डिपॉझिट्स
>> फक्त टर्म डिपॉझिट्स आणि स्पेशल टर्म डिपॉझिट्स

व्याज दर

या योजनेमध्ये SBI कडून 1,000 दिवसांच्या डिपॉझिट्सवर वार्षिक 6.10 टक्के व्याजदर दिला जात आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांना नियमित दरापेक्षा 0.50% अतिरिक्त व्याजदर मिळेल.

अशा प्रकारे व्याज देण्यात येईल

स्पेशल टर्म डिपॉझिट्स मासिक/ त्रैमासिक/ अर्धवार्षिक अंतराने – मॅच्युरिटीवर

TDS किती द्यावा लागेल ???

आयकर कायद्यानुसार दर लागू

SBI special fixed deposit scheme for senior citizens 'SBI WeCare' extended for third time till June 30

मुदती आधीच पैसे काढणे

रिटेल टर्म डिपॉझिट्सनुसार लागू

SBI नवीन FD दर

एसबीआय कडून ठेवीदारांना सध्या 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 5.65% पर्यंत व्याज दिले जाते आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक 6.45% पर्यंत व्याज देत आहे. 13 ऑगस्ट 2022 पासून हे नवीन व्याजदर लागू करण्यात आले आहेत.

अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : https://www.sbi.co.in/documents/136/1364568/220822-UTSAV+DEPOSIT.pdf

हे पण वाचा :

Bandhan Bank कडून आपल्या बचत खात्यावरील व्याजदरात बदल, नवीन दर पहा

PNB कडून ज्येष्ठ नागरिकांना FD वर मिळणार जास्त व्याजदर, नवीन दर तपासा

Gold Price : सोन्या-चांदीच्या दरात घसरण, गेल्या आठवड्यात बाजाराची स्थिती कशी होती ते पहा

Gold Price Today : सोन्या-चांदीच्या किंमतीत मोठा बदल, आजचा भाव पहा

Telegram चे ‘हे’ 5 फीचर्स आहेत खूप उपयोगी, त्याविषयी जाणून घ्या