2000 रुपयांच्या नोटा बदलाबाबत SBI चा मोठा निर्णय; बँकेने नेमकं काय म्हंटल?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । केंद्रातील मोदी सरकारने देशात पुन्हा एकदा नोटबंदी करत २००० रुपयांच्या नोटा चलनातून बंद केल्या आहेत. ग्राहकांना ३० सप्टेंबर पर्यंत नोटा बदलण्यासाठी बँकेत जावं लागणार आहे. एका दिवसात लोक जास्तीत जास्त 20,000 रुपये काढू शकतात. याच पार्श्वभूमीवर देशातील सर्वात मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियाने (SBI) ने मोठी घोषणा केली आहे. आता कोणतीही स्लिप न भरता ग्राहकांना २००० रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहे.

बँकेने 20 मे रोजीच्या परिपत्रकात म्हटले आहे की, 20,000 रुपयांच्या मर्यादेपर्यंतच्या रकमेसाठी मागणी स्लिप भरण्याची आवश्यकता नाही. म्हणजेच, लोक ही स्लिप न भरता एकावेळी 2,000 रुपयांच्या 10 नोटा बदलू शकतात. तसेच यासाठी कोणताही आयडी देण्याची गरज नाही. लोकांना 30 सप्टेंबरपर्यंत 2,000 रुपयांच्या नोटा जमा किंवा बदलण्यास सांगण्यात आले आहे. तसेच, बँकेने स्पष्ट केले की लोकांना देवाणघेवाण करताना ओळखपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही. एक्सचेंजच्या वेळी निविदाकाराने कोणताही ओळखीचा पुरावा सादर करण्याची आवश्यकता नाही.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांची नोट टप्प्याटप्प्याने चलनातून बाद करणार असल्याची घोषणा केली होती. 23 मे पासून बँकांमध्ये 2,000 रुपयांच्या नोटा बदलणे आणि जमा करणे सुरू होईल. त्यासाठी बँकांनी तयारी केली आहे.