Thursday, February 2, 2023

३० वर्षे जिथे काम केले तिथल्या प्रशासनावर तुमचा विश्वास नाही ?, याचिका फेटाळत परमबीर सिंहांना SCने सुनावलं

- Advertisement -

नवी दिल्ली वृत्तसंस्था: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. परमबीर सिंह यांच्या विरोधातील प्रकरणांची चौकशी ही महाराष्ट्र बाहेरच्या स्वतंत्र यंत्रणा नियुक्त करून करण्यात यावी अशी मागणी परमबीर सिंह यांनी केली होती मात्र आता ही याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

- Advertisement -

सर्वोच्च न्यायालयानं सुनावणीदरम्यान म्हटलं की, ” तुम्ही तीस वर्ष पोलीस दलात काम करत आहात मात्र आता महाराष्ट्राबाहेर चौकशी करण्याची मागणी करत आहात ? तुम्ही महाराष्ट्र कॅडरचा भाग आहात तरीही तुम्हाला तुमच्या राज्यावर किंवा तिथल्या प्रशासनाच्या चौकशी वर विश्वास नाही का ? असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने सुनावणी दरम्यान उपस्थित केला. परमबीर सिंह यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात न्यायमूर्ती हेमंत गुप्ता आणि न्यायमूर्ती वि रामसुब्रमण्यम यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली. सर्वोच्च न्यायालयाने याचिका कर्त्यांना मुंबई उच्च न्यायालयात दाद मागण्याची मुभा दिली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने परमबीर सिंह यांची याचिका फेटाळताना म्हटलं की, तुम्ही महाराष्ट्र कॅडरचे ज्येष्ठ पोलीस अधिकारी होता. सुमारे तीस वर्ष तुम्ही महाराष्ट्र कॅडरमध्ये सेवा केली आहे. तरीही तुम्ही राज्य सरकारच्या आणि पोलिस दलाच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचं आता सांगत आहात? हे अतिशय धक्कादायक आहे. यावेळी बोलताना सिंग यांचे वकील महेश जेठमलानी यांना देखील न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी सुनावलं ते म्हणाले ‘पोलिस महासंचालक दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकला जात असेल तर कोणत्याही दर्जाच्या अधिकाऱ्यावर दबाव टाकला जाऊ शकतो. विनाकारण काहीही गोष्टी सांगू नका.

दरम्यान न्यायमूर्ती हेमंत गुप्ता यांनी याप्रकरणी सुनावणी करताना “जिनके घर कांच के हों, वह दूसरों पर पत्थर नहीं फेंकते”असे ताशेरे परमबिर सिंह यांच्यावर ओढले आहेत. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्ध केलेली तक्रार मागे घेण्यासाठी आपल्या मागे चौकशी लावल्याचा दावा परमबीर सिंग यांनी केला आहे.