“आपले सरकार सेवा केंद्रात” 45 लाखांचा घोटाळा? सातारा जिल्ह्यातील घटनेने खळबळ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके

साताऱ्यातील खटाव तालुक्यातील आपले सेवा केंद्रांमध्ये सुमारे ४५ लाखांच्या वर अपहार झाल्याची माहिती जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी दिली आहे. तसेच तालुका स्तर चौकशी समिती यांनी तीन दिवसात व जिल्हा स्तरीय समितीने पाच दिवसाच्या आत याबाबत च्या चौकशीचा अहवाल जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेशही विनय गौडा यांनी दिले आहेत. या घटनेने संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे.

शासनाकडील मार्गदर्शक सूचनांनुसार ग्रामपंचायतीमध्ये उभारण्यात आलेल्या आपले सरकार सेवा केंद्रासाठी प्रति सेवा केंद्र दरमहा रुपये १०४५०/- सेवाकर (८%GST) सह इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्र आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) उभारणी करण्यात आले आहे. अशा ग्रामपंचायतींनी दरमहा रुपये १०४५०/- + १८% GST रुपये १८८१/-) म्हणजेच रुपये १२३३१/- प्रति केंद्र व ज्या ग्रामपंचायती क्लस्टरमध्ये समाविष्ट आहेत अशा ग्रामपंचायतींनी त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात रक्कम विभागणी करून निश्चित करण्यात येते. त्यानुसार प्रत्येक आपले सरकार सेवा केंद्र (ASSK) साठी निश्चित करण्यात आलेली एकूण रक्कम रुपये १२३३१/- प्रमाणे १२ महिन्यांची रक्कम रुपये १४७९७२/- प्रति केंद्र इतकी रक्कम निश्चित करण्यात आली आहे.

प्रति केंद्र अग्रीमाची रक्कम ग्रामपंचायतीं कडून जिल्हा स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने IDBI Bank Ltd. Branch Satara City Pratapganj Peth यामध्ये उघडण्यात आलेल्या बचत खात्यामध्ये (खाते नंबर 0451104000218801) RTGS NEFT द्वारे जमा/ वर्ग करण्याबाबत गट विकास अधिकारी यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत. वरील कार्यपध्दतीनुसार वेळोवेळी ग्रामपंचायतीकडून आपले सरकार सेवा केंद्राच्या मोबदल्याच्या अग्रीम रक्कमा जिल्हास्तरावरील बचत खात्यामध्ये वर्ग करण्यात आलेल्या आहेत याबाबतचा ग्रामपंचायतीमार्फत अपलोड करण्यात येणाऱ्या UTR च्या आधारे घेण्यात येतो.

https://www.instagram.com/reel/ChpY89sJkc0/?igshid=YmMyMTA2M2Y=

यासंदर्भात जिल्हा स्तरावर ताळमेळ नुसार २६७ ग्रामपंचायतींनी अद्यापही अग्रीम रक्कम वर्ग केलेली नाही] [व] युटीआर अपलोड केल्यात जिल्हा सारावर दिनांक ०९/०८/२०२२ रोजी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीनूसार खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जमा केलेल्या आपले सरकार सेवा केंद्र मोबदल्याच्या रकमेमध्ये व प्रत्यक्षात जिल्हा स्तरावरील आपले सरकार सेवा केंद्र मोबदला या नावाने IDBI Bank Ltd. Branch Satara City Pratapganj Peth याच बँकेत असलेल्या खात्यात जमा झालेल्या रकमेमध्ये तफावत असलेचे आढळून येत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.

सदरच्या अनुषंगाने अधिक माहिती घेतली असता खटाव तालुक्यात “आपले सरकार सेवा केंद्र” या नावाने एकाच बॅंकेत याच नावाने खाते नंबर 1453100000000156 या डुप्लीकेट खात्याचे दिनांक ११/०८/२०१९ ते १०/०८/२०२२ या कालावधीत ग्रामपंचायतींची अग्रीम रक्कम जमा करण्यात आली असून जमा झालेल्या रक्कमा काही व्यक्तींच्या नावे वर्ग झाल्याचे बॅंक स्क्रोल नुसार दिसून येत आहे. यावरून रक्कम रु.४५,१३,८८८.१५ इतक्या रक्कमेचा गंभीर आर्थिक अपहार केलेचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले आहे. अशी बाब इतर तालुक्यातही घडलेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही.

प्रस्तुत प्रकरणी सर्व तालुक्यातील ग्रामपंचायतींचा सन २०१६ पासून ताळमेळ घेवून अग्रीम रकमांमध्ये गैरव्यवहार / अपहार झाला आहे किंवा नाही याबाबतची चौकशी करणे आवश्यक आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यातील ग्रामपंचायतींनी जिल्हा स्तरावरील “आपले सरकार सेवा केंद्र मोबदला” या खात्यामध्ये जमा केलेल्या रक्कमांचा ताळमेळ घेणेची आवश्यकता असलेने व सदर ताळमेळ शिघ्रगतीने पूर्ण करण्यासाठी तालुका स्तरावर वा जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करून कार्यवाही करणे आवश्यक आहे अशी सूचना विनय गौडा यांनी केल्या.

त्याआर्थी, महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम-१९६१ चे कलम ९५ अन्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून त्यांच्या आदेशान्वये तालुका स्तरीय व जिल्हा स्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. चौकशी समितीमार्फत खालील मुद्यांचे अनुषंगाने ग्रामपंचायत निहाय आपल्या सरकार सेवा केंद्रांची अग्रीम रक्कमेबाबत चौकशी करून स्वंयस्पष्ट अभिप्राय गोपनिय चौकशी अहवाल सदर आदेशाच्या दिनांक पासून तालुका स्तर चौकशी समिती यांनी तीन दिवसात व जिल्हा स्तरीय समितीने पाच दिवसाच्या आत या जिल्हा परिषद कार्यालयाकडे सादर करणेबाबत आदेश मा.विनय गौडा, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद सातारा यांनी दिली.

“आपले सरकार सेवा केंद्रांमध्यील” रक्कम बुडणार कि गंगाजळी करण्यात येणार?

एकट्या खटाव तालुक्यातील “आपले सरकार सेवा केंद्र मोबदला” या नावाने बोगस अकाऊंट काढून झालेल्या ४५,१३,८८८.१५ रूपयांचा अपहार करणाऱ्या त्या संबंधितांकडून सदरच्या अपहरणाची रक्कम वसूल केली जाणार? की गुन्हा दाखल करून सदरच्या रक्कम गंगाजळी करण्यात येणार? अशी चर्चा जनमानसात सुरू आहे.