हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य शासनाने गणेशोत्सव, दिवाळी आणि इतर सणावारांच्या दिवशी गरीब कुटुंबांना ‘आनंदाचा शिधा'(Aanandacha Shidha) देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र आनंदाचा शिधा या योजनेमध्येच गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. पाथर्डी तालुक्यातील रेशन दुकानदारांना गेल्या चार महिन्याचा आनंदाचा शिरा देण्यात आला होता. हा शिधा विकून झाल्यानंतर त्याचे पैसे आम्ही पुरवठा विभागात काम करणाऱ्या तरुणाकडे रेशन दुकानदारांनी दिले होते. मात्र या तरुणाने ही रक्कम शासकीय कोषागार भरलीच नसल्याचा आरोप तरुणावर लावण्यात आला आहे. तर दुसरीकडे ही रक्कम त्वरित जमा करा असा आदेश महसूल विभागाकडून देण्यात आला आहे.
50 लाखांचा घोटाळा
पाथर्डी तालुक्यामध्ये एकूण 164 इतकी रेशन दुकाने आहेत. दीपावली, पाडवा व गणपती काळामध्ये या सर्व दुकानदारांना आनंदाचा शिधा देण्यात आला होता. या शिद्याची एकूण रक्कम तब्बल 50 लाख रुपये अशी होती. हा शिरा विकून झाल्यानंतर त्याची रक्कम रेशन दुकानदारांनी शासकीय कोषागार भरणे हे बंधनकारक आहे. दुकानदारांनी सांगितले की, एका शासकीय अधिकाऱ्यांनी आदेश दिला होता की शिधा विकून झाल्यानंतर त्याची रक्कम एका तरुणाकडे जमा करावी. त्यानुसार सर्व दुकानदारांनी ही रक्कम तरुणाकडे जमा देखील केली. परंतु तरुणानेच रक्कम कोषागारात भरली नसल्याचा आरोप दुकानदारांनी लावला आहे. या सर्व प्रकरणामुळेच आनंद शिधामध्ये घोटाळा झाल्याचे उघड आले आहे.
दरम्यान, रेशन दुकानदारांना तीन टप्प्यांमध्ये आनंद शिधा देण्यात आला होता. त्यामुळे आता या शिध्याचे पैसे विभागात जमा करा असे आदेश रेशन दुकानदारांना देण्यात आले आहेत. मात्र आम्ही अगोदरच पैसे दिले असताना पुन्हा का पैसे देऊ? असा प्रश्न रेशन दुकानदारांनी निर्माण केला आहे. मुख्य म्हणजे एखाद्या अधिकाऱ्यांनी तिसऱ्या व्यक्तीकडे पैसे जमा करण्यास का सांगितले? हा देखील मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व प्रकरणामुळे आनंदाच्या शिध्यात झालेला सावळागोंधळ उघडकीस आला आहे.