कासला जाऊन बोअर झालायत? तर साताऱ्यातील ‘या’ फुलांच्या पठाराला एकदा भेट द्याच; अंतर अन वैशिष्ट्य चेक करा..

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । श्रावण महिन्यात निसर्गाचा अद्भुत अविष्कार पहायला मिळतो. या महिन्यात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणचे धबधबे ओसंडून वाहतात. मग ते पाहण्यासाठी ट्रीपही काढली जाते. मात्र, जायचे कोठे? असा प्रश्न अनेकांना पडतो. सातारा जिल्ह्यात श्रावण महिन्यात फिरण्यासारखी अनेक ठिकाणी आहेत. त्यापैकी एक म्हणजे सातारा येथून 30 किमी अंतरावर असलेले भांबवलीतील पुष्प पठार होय. हे पुष्प पठार महाराष्ट्राच्या पश्चिम भागात आहे. उंच पर्वतरांगा आणि गवताळ प्रदेशात वसलेल्या पठारावर 150 पेक्षा अधिक प्रकारची फुले, झुडुपे आणि हिरवेगार गवत आहेत.

भांबवलीतील पुष्प पठार मोठ्या प्रमाणावर बेसाल्ट दगडांनी बनलेले आहे. पुष्प पठार त्याच्या दुर्मिळ वनस्पती आणि विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील आढळून येणाऱ्या प्राण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. करवी, सोनकी, स्मितिया, बाल्म, ऑर्किड अशा काही पुष्प जाती या ठिकाणी आहेत ज्या या पठारात उमलतात.

भांबवली पुष्प पठार देखील कास पठाराप्रमाणे त्याच्या दुर्मिळ वनस्पती, विशिष्ट प्रदेशातील किंवा कालखंडातील आढळून येणाऱ्या झुडपे आणि प्राण्यांसाठी ओळखले जाते. वेगवेगळ्या आणि दुर्मिळ फुलांनी हे ठिकाण भरले आहे. येथील जैवविविधता समृद्ध आहे. पठारावर अनेक स्थानिक, जंगली वनस्पती आढळतात. आकर्षक नैसर्गिक फुलांनी गच्च भांबवली पठारास भेट देण्यास पर्यकांना नक्कीच आवडणारे आहे. याठिकाणी ऑगस्ट आणि ऑक्टोबर महिन्यात लाखो पर्यटक भेट देण्यासाठी येतात.

Bhambvali Pushpa Plateau

कशी भेट द्याल ?

भांबवलीतील पुष्प पठारास भेट देण्यासाठी एकूण दोन मार्ग आहेत. सातारा येथून भाम्बावली 32 किमी इतक्या अंतरावर आहे. या ठिकाणी सातारा ते कास आणि कासपासून तांबी (भांबवली) पर्यंत जाता येते. तसेच महाबळेश्वर ते तापोळापर्यंत जाऊन तेथून पुढे बामणोली-कास, कास ते तांबी (भांबवली) असे जाता येते.

Bhambvali Pushpa Plateau

भांबवली पुष्प पठारावर भेट देण्याची वेळ –

सातारा जिल्ह्यातील महत्वाचे निसर्ग ठिकाणांपैकी एक महत्वाचे असलेल्या भाम्बवली पुष्प पठारावर पर्यटक काही ठराविक वेळीसच भेट देऊ शकतात. यामध्ये सकाळी 8.00 ते संध्याकाळी 5.00 पर्यंत भेट देता येऊ शकते. अतिवृष्टी आणि धुक्यात या ठिकाणास भेट देताना काळजी घ्यावी लागते. कारण पावसाळ्यात पठारी भाग निसरडा असल्याने पाय घसरून खाली पडल्यानंर दुखापत होण्याची शक्यता असते.

Bhambvali Pushpa Plateau

पुष्प पठारावर भेट देताना काय काळजी घ्याल?

1)योग्य पादत्राणे वापरावीत.
2) दगडाचे पृष्ठभाग अतिशय निसरडा असल्याने जपून चालावे.
3) पाने, फुले आणि फळे, मशरूम खात्री केल्याशिवाय खाऊ नये
4) सर्प आणि सरपटणाऱ्या जीवापासून सावध रहावे.