हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन। (Schengen Visa New Rules) युरोपियन युनियन अंतर्गत येणाऱ्या देशांमध्ये प्रवास करणाऱ्या भारतीयांसाठी एक महत्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. युरोपियन युनियनने भारतीयांसाठी व्हिसाच्या नियमांमध्ये काही विशेष बदल केले आहेत. ज्यामुळे भारतीयांना काही विशेष लाभ मिळणार आहेत. युरोपीय देशांत जाण्यासाठी भारतीयांकडे शेंजेन व्हिसा असणे आवश्यक आहे. कारण या व्हिसाच्या माध्यमातून पर्यटक विविध युरोपीय देशांना भेट देऊ शकतात. याच व्हिसासंबंधी युरोपियन युनियनने काही नियम बदलले आहेत. ज्याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
शेंजेन व्हिसाच्या नियमावलीत बदल (Schengen Visa New Rules)
युरोपियन युनियनने भारतीयांसाठी ५ वर्षांच्या वैधतेसह मल्टीपल एंट्री शेंगेन व्हिसासाठी काही नियम लागू केले आहेत. यानुसार आता भारतीय पर्यटक शेंजेन व्हिसामुळे २९ युरोपीय देशांना भेट देऊ शकतात. हा व्हिसा ९० दिवसांपर्यंत जारी केलेला ‘शॉर्ट स्टे’ व्हिसा आहे. जो तुम्हाला कोणत्याही युरोपीय देशांमध्ये प्रवास करण्यासाठी मुक्त परवानगी देतो.
माहितीनुसार, याआधी ३ वर्षांत २ वेळा हा व्हिसा घ्यावा लागत असे. मात्र, १८ एप्रिल २०२४ रोजी नवे नियम लागू करण्यात आले आहेत. या नियमांनुसार भारतीयांना मल्टीपल एन्ट्री शेंजेन व्हिसा (Schengen Visa New Rules) मिळणार आहे. मुख्य म्हणजे, या नियमावलीत बदल झाल्याने व्हिसाचा खर्चही काही प्रमाणात वाचतोय. सध्या लहान मुक्कामाच्या व्हिसाची किंमत अंदाजे ७ हजार रुपये इतकी आहे.
शेंजेन व्हिसासाठी कसा अर्ज करायचा?
तुम्हाला युरोपमधील ज्या देशाला भेट द्यायची आहे त्या शेंजेन देशाच्या वाणिज्य दूतवासात तुम्ही अर्ज करू शकता. तिथल्या सर्व शेंजेन देशांना भेट देण्याची माहिती यावेळी तुम्हाला दिली जाईल. हे दूतावास आपल्या देशाच्या राजधानीत स्थापन झाले असून तुम्ही ज्या देशात सर्वाधिक वेळ घालवता, त्या देशाचे स्थान इथे कोड केलेले असतात. (Schengen Visa New Rules) नियमांत बदल झाल्यापासून युरोपमधील विविध देशांचे कागदपत्र एकत्र केले जात आहेत. आतापर्यंत अल्प वैधतेमुळे शेंजेन व्हिसा हा भारतीय प्रवाशांसाठी त्रासदायक ठरत होता. कारण यासाठी काहीवेळा स्वतंत्र अर्ज करावे लागत होते.
मात्र युरोपियन युनियनने सांगितल्याप्रमाणे, अल्प- मुदतीच्या शेंजेन व्हिसासाठी अर्ज करणाऱ्या भारतीयांना नवीन व्हिसा कॅस्केड व्यवस्था प्रस्थापित प्रवाशांसाठी बहु- वर्षीय वैधता असलेल्या व्हिसावर सुलभ प्रवेश दिला जाणार आहे. (Schengen Visa New Rules) त्यामुळे आता कोणताही भारतीय नागरिक सिंगल व्हिसा घेऊन युरोपमधील कोणत्याही देशात जाऊ शकतो. मात्र लक्षात घ्या, जोपर्यंत तुमच्याकडे पासपोर्ट वैधता परवानगी आहे केवळ तोपर्यंत तुम्ही युरोपीय देशात मुक्त फिरू शकता.
कसे करते काम?
शेंगेन व्हिसा हा स्टिकर स्वरूपात असल्यामुळे तो तुमच्या पासपोर्टवर किंवा प्रवासी दस्तऐवजावर चिकटवला जातो. हा स्टिकर तुम्ही शेंगेन राज्यांमध्ये प्रवास करत असताना तुमच्या परवानगीचे प्रतीक ठरेल. लक्षात घ्या, यासाठी तुम्हाला शेंगेन कन्व्हेन्शनने ठरवलेल्या इतर अटींची पूर्तता करावी लागेल. तरच तुम्हाला इतर राज्यांमध्ये प्रवेश दिला जाईल. या अटींमध्ये प्रवासाचा उद्देश, प्रवासाच्या अटी आणि तुमच्याकडे पुरेसा निधी असणे यांचा समावेश आहे. (Schengen Visa New Rules)