सहलीला निघालेल्या स्कूलबसचा अपघात; 22 जण जखमी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । परभणीच्या गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी येथे सहलीला निघालेल्या विद्यार्थ्यांच्या बसचा आणि एसटीचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 22 जण जखमी झाले असून काहींची प्रकृती गंभीर आहे. या भीषण अपघातात दोन्ही बसचा समोरील भाग पूर्णपणे चेपला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गंगाखेडच्या संत जनाबाई विद्यालयाची शैक्षणिक सहल चाकूरकडे जाणार होती. याच वेळी अहमदपूर येथून बुलढाण्याच्या जाणारी बस गंगाखेड-राणीसावरगाव रस्त्यावरील खंडाळी पाटीवर आली असता दोन्ही बसची समोरासमोरच धडक झाली. दोन्ही अपघातग्रस्त बसची अवस्थात पाहून ही धडक किती भीषण होती, याचा अंदाज येतो. या अपघातात या दोन्ही बसमधील तब्बल 22 जण जखमी झाले आहेत तर 6 जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमीमध्ये 10 ते 15 वर्षांचे तीन विद्यार्थी आहेत. 20 ते 22 वर्ष वय असलेले पाच जण आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनीही तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना रुग्नालय दाखल केले. यातील 4 ते 5 गंभीर जखमींना परभणी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. तर इतरांना गंगाखेड येथील उपजिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आलं आहे.