हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।School Bus Fee – विद्यार्थी आणि पालकांसाठी हि बातमी महत्वाची ठरणार आहे. आताच काही दिवसांपूर्वी एसटी, रिक्षा आणि टॅक्सिच्या तिकिटात वाढ करण्यात आली आहे. पण आता शाळेतील विद्यार्थाना घ्यायला येणाऱ्या बसच्या भाड्यात 18 % वाढ होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हा निर्णय शालेय बस संघटनेने घेतला असून येत्या 1 एप्रिलपासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. त्यामुळे पालकवर्गाला जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. तर चला या नवीन नियमांबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात .
1 एप्रिल 2025 पासून शालेय बसच्या भाड्यात वाढ –
1 एप्रिल 2025 पासून शालेय बसच्या भाड्यात (School Bus Fee)वाढ होणार असल्याचे शालेय बस ऑपरेटर असोसिएशनने (एसबीओए) सांगितले आहे. “मुंबईसह राज्यात शालेय बसव्यतिरिक्त रिक्षा, टॅक्सींमधूनही विद्यार्थी वाहतूक केली जाते. ही वाहतूक बेकायदा आहे. राज्य सरकारने बेकायदा विद्यार्थी वाहतुकीला आळा घातल्यास दरवाढ रद्द करण्यात येईल”, असे अनिल गर्ग (एसबीओएचे अध्यक्ष ) यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे.
पालकवर्गाचे टेन्शन दुप्पट (School Bus Fee)–
आधीच एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या भाडेवाडीमुळे सर्वसामान्य जनता चिंतेत होती. पण आता या शालेय बसच्या दर वाढीने त्यांचं टेन्शन दुप्पट केलं आहे. म्हणजेच आता पालकवर्गाला एसटी, रिक्षा आणि टॅक्सीच्या दरवाढीसोबतच शालेय बसच्या दर वाढीचा सामना करावा लागणार आहे.