संतापजनक ! विद्यार्थ्यांना भरपाण्यात उभं करून शिक्षिकेने स्वतःसाठी बनवायला लावला पूल

school students built chair bridge for teacher
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

भोपाळ : वृत्तसंस्था – शाळेत विद्यार्थ्यांना टॉयलेट साफ करायला लावणं, विद्यार्थ्याकडून मालिश करून घेणं यानंतर शाळेतील आणखी एक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यामध्ये एका शिक्षिकेने विद्यार्थ्यांना भरपाण्यात उभे केले आणि स्वतःसाठी पूल बनवायला (school students built chair bridge for teacher) सांगितला. त्यानंतर ती त्या पुलावरून चालत पाण्यातून बाहेर आली. या संतापजनक प्रकारचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

कुठे घडला हा प्रकार ?
मध्य प्रदेशच्या मथुरामधील एका शाळेत हि धक्कादायक घटना घडली आहे. मागच्या काही दिवसापासून पडणाऱ्या पावसामुळे शाळेबाहेर पाणी भरले होते. या पाण्यातून जाण्यासाठी शिक्षिकेने विद्यार्थ्यांना कामाला लावलं. तिने विद्यार्थ्यांना पाण्यात उतरवलं आणि त्यांना खुर्च्या देऊन या खुर्च्या रांगेत लावायला सांगितल्या. पाण्यात तिने स्वतःसाठी खुर्च्यांचा पूल बनवून (school students built chair bridge for teacher) घेतला आणि तो पार करत ती पाण्यातून बाहेर पडली.

ही घटना दघेटातील प्राथमिक शाळेमध्ये घडली आहे. या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता मुलं पाण्यात खुर्च्या धरून उभे आहेत आणि शिक्षिका त्या खुर्च्यांवर एकएक पाय टाकत पुढे जाताना दिसते आहे. मुलं पाण्यात उभी राहू शकतात, यावरूनच हे पाणी इतकंही नाही की शिक्षिकेला पुलावरून (school students built chair bridge for teacher) जाण्याची गरज पडावी. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सगळीकडे संताप व्यक्त केला जात आहे.

हे पण वाचा :
शिवसेनेचा बंडखोर आमदार संतोष बांगर यांना मोठा दणका; केली ‘ही’ कारवाई

धक्कादायक ! कोल्हापुरात स्वतःच इंजेक्शन घेऊन डॉक्टर तरुणीची आत्महत्या

Petrol-Diesel Price : पेट्रोल, डिझेलची आज ‘इतकी’ वाढली किंमत?; जाणून घ्या आजचे दर

हिंगोलीत किरकोळ वादातून गाड्या पेटवल्या; भाजप युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षावर गुन्हा दाखल

INS Vikrant ची चौथी चाचणी यशस्वी; भारताच्या सागरी शक्तीत पडणार भर