चिंताजनक! महाराष्ट्रातील शालेय विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण; आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत वाढ

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नवीन वर्षाला सुरुवात होताच महाराष्ट्रातील नागरिकांचे टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. अहमदनगरमधील शालेय विद्यार्थ्यांना करोनाची लागण झाली आहे. या एका बातमीमुळे आरोग्य यंत्रणेची देखील झोप उडाली आहे. सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. ज्यामध्ये त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, अहमदनगर तालुक्यात एका शाळेत शिकणारे दोन विद्यार्थी कोरोना बाधित आढळले आहेत. गेल्या तीन दिवसांपूर्वीच सर्दी खोकला झाल्यामुळे या विद्यार्थ्यांची रॅपिड अँटीजेन तपासणी करण्यात आली होती. या तपासणीचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे आरोग्य प्रशासन यंत्रणेच्या चिंतेत आणखीन वाढ झाली आहे.

सध्या या दोन्ही विद्यार्थ्यांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर योग्य उपचार देखील सुरू आहेत. दरम्यान, दिवसेंदिवस राज्यातील अनेक भागांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळण्यास सुरुवात झाली आहे. यामध्ये कोरोनाचा आणखीन एक नवीन विषाणू सापडल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता नागरिकांनी सावध राहून गर्दीत मास्कचा वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केले आहे.