मोठी बातमी! राज्यातील शाळांची वेळ बदलली; शासनाकडून जीआर जारी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| राज्य सरकारने शाळांच्या वेळेसंदर्भात (School Time) एक मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व पूर्व प्राथमिक ते चौथीपर्यंतच्या शाळा सकाळी नऊ वाजल्यानंतर किंवा नऊ वाजता भरवा, असा जीआर सरकारने जारी केला आहे. या निर्णयामुळे आता सर्व शाळांना या वेळेनुसार शाळा भरवणे सक्तीचे असणार आहे. राज्य सरकारने मुलांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता मुलांना शाळेत जाण्यासाठी लवकर उठावे लागणार आहे.

यापूर्वी प्राथमिक शाळा या सकाळी सात वाजता सुरू व्हायच्या. यामुळे विद्यार्थ्यांची झोप अपुरी राहत असत याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्यावर देखील होत होता त्यामुळे राज्य शासनाने या शाळांची वेळ बदलण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी एका भाषणामध्ये राज्यपालांनीच शाळांच्या वेळा बदलण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावर विचार करण्यात येईल असे शालेय शिक्षण मंत्र्यांनी सांगितले होते. त्यानंतरच राज्य शासनाने याची अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी राज्यातील 65 हजार हून अधिक सरकारी शाळांमध्ये होईल.

शासनाच्या जीआरमध्ये काय म्हटले आहे?

  • शासन जारी जीआरमध्ये म्हणलेले आहे की, राज्यातील सर्व व्यवस्थापनांच्या शाळांपैकी काही शाळा भरण्याची वेळ सकाळी सात वाजताची आहे. सध्याच्या आधुनिक युगात बदललेल्या जीवनशैलीमुळे मनोरंजनाची विविध साधने उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी रात्री उशिरा झोपत आहेत आणि सकाळी लवकर उठत आहेत. यामुळे त्यांची झोप अपुरीच राहत आहे. याचा नकारात्मक परिणाम त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर होत आहे.
  • पालकांच्या मध्ये देखील झोप पूर्ण न झाल्यामुळे विद्यार्थी लवकर उठण्यास नकार देतात. यामुळे त्यांचा शाळेत जाण्याचा उत्साह देखील कमी होतो. तसेच मोसमी हवामान, हिवाळा व पावसाळा असला तरी विद्यार्थ्यांना उठून शाळेत जावे लागते. पावसामुळे आणि थंडीमुळे तर विद्यार्थ्यांना जास्त त्रास होतो.
  • तसेच सकाळी पाल्याला तयार करणे, जेवणाचा डबा बनवणे, त्याला वेळ शाळेत पोहोचवणे अशा इतर कारणांमुळे देखील पालकांची ओढाताण होते. पावसाळ्यात थंडीच्या काळामध्ये विद्यार्थ्यांना बस आणि व्हॅनने शाळेत येताना रस्त्यावर धुके पाऊस असल्यामुळे अपघाताच्या घटना देखील घडतात.
  • अशा सर्व अडचणी पाहता आणि कारणे बघून शासकीय व नियम शासकीय कार्यालयाच्या वेळा व शाळांच्या वेळा समांतर समांतर येणार नाही याची दक्षता घ्यावी. या सर्व बाबी तपासून शासनाने मुलांच्या शाळेच्या वेळा बदलण्याचा मोठा निर्णय घेतला आहे.