Tuesday, March 21, 2023

कोरोना रूग्ण आढळल्याने जिल्ह्यातील 30 शाळा बंद

- Advertisement -

औरंगाबाद | जिल्हयात तिसऱ्या लाटेचा प्रभाव कमी झाला असला तरी काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने जिल्ह्यातील शाळा बंद असलेल्या दिसून येत आहे. 15 जुलैला कोरना मुक्त गावात आठवी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. मात्र काही गावांमध्ये कोरोना रुग्ण आढळल्याने 605 शाळांपैकी तीस शाळांचे वर्ग बंद करावे लागले आहेत.

जिल्हा परिषद शिक्षण विषय समिती सभापती अविनाश गलांडे यांनी बुधवारी शाळांची उपस्थिती, बालविवाह, शिक्षक समायोजन, वादळ वाऱ्याने झालेल्या नुकसान संबंधीचा आढावा घेतला. बैठकीला शिक्षणाधिकारी डॉ. बी. बी. चव्हाण, सदस्य पुष्पा काळे, शिल्पा कापसे, रेणुका जाधव, बबन कंधारे, बळीराम भुमरे प्रभाकर पवार यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

- Advertisement -

या बैठकीमध्ये कोरोना नसलेल्या महानगरपालिका नगरपंचायत शाळा सुरू करण्याची मागणी करण्यात येत आहे. परंतु शासनाने काढलेल्या आदेशानुसार केवळ सरपंच व ग्रामसेवकांना शाळा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे अनेक शाळा बंद आहेत. जेथे कोरोनाचे रुग्ण नाही त्या ठिकाणच्या शाळा सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात येणार आहे.