सातारा प्रतिनिधी । येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आणि महाराष्ट्र केडेमी ऑफ सायन्सेस पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने प्राध्यापक पंडित विद्यासागर माजी कुलगुरू स्वामी रामानंद तिर्थ मराठवाडा विद्यापीठ यांचे व्याख्यान आज दि २९ जानेवारी २०२० रोजी कर्मवीर सभागृहात आयोजित करण्यात आले होते.
२९ ते ३१ जानेवारी २०२० या तीन दिवस चालणाऱ्या मल्टी फंक्शनल अँड हायब्रीड मटेरियल फॉर एनर्जी अँड एन्व्हायरमेन्ट या आतंरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन भौतिकशास्त्र विभागाच्या वतीनं आयोजन केलं आहे. दरम्यान, समाजामध्ये विज्ञानाची रुची निर्माण व्हावी यासाठी या परिषदेच्या निमित्ताने पंडित विद्यासागर यांच्या व्याख्यानाचे आयोजन यावेळी करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी जेष्ठ साहित्यिक प्रा. अजित पाटील , सी मेट चे डायरेक्टर डॉ भारत काळे, पुणे विद्यापीठाचे अधिष्ठाता प्राचार्य डॉ. एम.जी.चासकर, ब्रेनपुल सायंटिस्ट डॉ. दिनेश अंमळनेरकर, डॉ. यु .पी. मुळीक, प्राचार्य डॉ. के. जी.कानडे, सकाळचे संपादक श्री दिलीप चिंचकर उपस्थित होते.
यावेळी प्रोफेसर पंडित विद्यासागर यांनी विज्ञानाची सुरुवात कुतूहलामधून कशी होते, त्यातून पुढे निरीक्षण, प्रयोग करणे, माहिती गोळा करणे, त्या माहितीचे विश्लेषण करणे आणि निष्कर्ष काढणे ही प्रक्रिया कशी केली जाते याचे विवेचन न्यूटन, आइन्स्टाइन, मेरी क्यूरी या शास्त्रज्ञांची उदाहरणे देत केले. समाजाने विज्ञानाबद्दल जागरूक राहण्याची, वैज्ञानिक घटनांबद्दल मत व्यक्त करण्याची खूप गरज आज आहे असेही प्रतिपादन त्यांनी केले. विज्ञानाने आजवर केलेल्या प्रगतीबद्दल बोलताना त्यांनी आपण तंत्रज्ञान स्वीकारले पण विज्ञान कसे स्वीकारले नाही, आणि याचे कारण आपण रॅशनल कोशट स्वीकारले नाहीय आपण भावनिक विचार जास्त करतो. प्रदूषणामुळे ग्लोबल वॉर्मिंग कसे वाढत चाललेय, प्रत्येक गोष्टीत भेसळ कशी होत चालली आहे आणि यासाठी विज्ञान कसे जबाबदार नाही हे सांगत समाज आणि विज्ञानाचे विविध पैलू त्यांनी यावेळी आपल्या व्याख्यानातून उलगडले.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.
हे पण वाचा-
डेबिट किंवा क्रेडिट कार्ड व्यवहारावरील एमडीआर शुल्क माफ होणार; अर्थसंकल्पात होऊ शकते घोषणा
दलितांच्या हत्या हे पण गुजरात माॅडेलच – नागनाथ कोतापल्ले