Scorpion Farming | सोशल मीडिया हे आताच्या काळात मानवाला मिळालेले खूप मोठे वरदान आहे. कारण या सोशल मीडियामुळेच आपण घरबसल्या जगभरातील सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. त्यामुळे आपल्याला अनेक नवनवीन आणि वेगळ्या गोष्टींची माहिती मिळते. ज्या गोष्टींचा आपण कधी विचारही केलेला नसतो त्या गोष्टी आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात.
आजपर्यंत आपण भाज्यांची धान्यांची शेती पाहिलेली आहे. त्याचप्रमाणे पशुपालनामध्ये कोंबडी पालन, शेळीपालन पाहिलेले आहे. पण तुम्ही कधी विंचवाची शेती पाहिलेली आहे का? हा प्रश्न वाचून तुम्हाला कदाचित चेष्टा वाटली असेल. परंतु हे अगदी खरे आहे की विंचवाची (Scorpion Farming) शेती केली जाते. त्या विंचूंची देखरेख करून माणसं लोक लाखो रुपये कमवतात आता याच विंचवाच्या शेतीची आपण सविस्तरपणे माहिती घेऊयात . ती शेती कोण करू शकतो आणि कशाप्रकारे करू शकतो याची देखील माहिती घेऊया.
कशी करतात विंचवाची शेती ? | Scorpion Farming
सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये त्यांनी विंचवाची शेती केलेली आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता की, एका रूममध्ये कितीतरी विंचू ठेवलेले आहेत. एकाच रूममध्ये ब्लॉक करून विंचवांना ठेवण्यात आलेला आहे. त्यांना जेवण देखील दिले जाते. त्याचप्रमाणे त्यांच्यावर औषधही शिंपडले जाते. विंचवाची शेती करताना खूप काळजी घ्यावी लागते. कारण यामुळे आपल्या जीवाला देखील धोका असतो. आता याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
विंचवाची शेती ही दोन गोष्टींसाठी केली जाते एक तर त्यांच्या विषाचाचा वापर करून औषधे तयार केली जातात. आणि कॅन्सर सारख्या आजारांवर मात करण्यासाठी औषधांमध्ये विंचवाच्या विषाचा वापर केला जातो. हेच विष जमा करण्यासाठी विंचवाची शेती आजकाल अनेकजण करतात. विंचवाच एक लिटर विष इंटरनॅशनल मार्केटमध्ये 85 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीत विकले जात. एका विंचूमध्ये दोन मिलिलीटर एवढे विष असतं म्हणजे. 500 विंचांचे विष जर तुम्हाला मिळालं तर तुम्ही कोट्यावधी होऊ शकता.
या विंचवाच्या शेतीतून खूप मोठा फायदा शेतकऱ्याला होतो. परंतु तेवढाच स्वतःच्या जीवाशी देखील खेळ केला जातो. कारण विंचू जर आपल्याला डसला तर त्याचे विष आपल्या शरीरात जाऊन जाते आणि त्यामुळे आपल्या शरीराला देखील धोका निर्माण होऊ शकतो.