हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) आणि मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकारने प्रधानमंत्री आवास योजनेच्या (PMAY-U) दुसऱ्या टप्प्याला मान्यता दिली असून, या योजनेच्या माध्यमातून 1 कोटी नवीन घरे बांधण्याचे सरकारचे ध्येय आहे . या योजनेतून प्रत्येक लाभार्थ्याला 2.50 लाख रुपयांचे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यची स्वप्ने पूर्ण होण्यास मदत मिळणार आहे.
योजनेचे उद्दिष्ट-
सरकारचा मुख्य उद्देश देशातील सर्वसामान्य कुटुंबांना स्वस्त आणि परवडणारी घरे उपलब्ध करून देणे हा आहे. PMAY-U 2.0 अंतर्गत EWS व मध्यमवर्गीयांसाठी गृहसिद्धीचा मार्ग सुकर केला जाणार आहे.
पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे –
योजनेसाठी अर्जदाराचा आधार क्रमांक, आधारनुसार नाव व जन्मतारीख भरणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराचे चालू बँक खात्याची माहिती , उत्पन्नाचा पुरावा, जात प्रमाणपत्र (SC, ST, OBC बाबतीत), आणि जमिनीची कागदपत्रे सादर करावी लागतील. सर्व कागदपत्रे PDF फॉरमॅटमध्ये असणे आवश्यक आहे.
अर्ज प्रक्रिया सुरू –
PMAY-U 2.0 योजनेत अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र लाभार्थी ऑनलाईन अर्ज करू शकतात. अर्जासाठी पहिल्यांदा https://pmaymis.gov.in/PMAYMIS2_2024/PmayDefault.aspx या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या फॉर्ममध्ये माहिती भरावी लागेल . त्यानंतर आधारशी जोडलेल्या मोबाईल नंबरवर OTP येईल. हा OTP टाकल्यानंतर पुढील प्रक्रिया सुरू होते. पात्रतेच्या पडताळणीनंतर सरकारकडून फायनल मान्यता दिली जाते. PMAY-U 2.0 ही योजना घराचे स्वप्न पाहणाऱ्या अनेकांसाठी सुवर्णसंधी ठरणार आहे. या योजनेद्वारे शहरी भागातील गरजू कुटुंबांना स्वतःचे घर मिळवण्याचा मार्ग सोपा होणार आहे .