औरंगाबाद | ती 15 वर्षांची आणि तो 21 वर्षांचा किरायानेच खोली घेऊन राहायचे. दरम्यान, दोघामध्ये प्रेम जुळले आणि दीड वर्षांपूर्वी दोघेही सैराट झाले.गुन्हा दाखल झाला पोलीसांची शोधाशोध सुरू झाली मात्र दोघेही काही सापडेनात. अखेर दीड वर्षानंतर फेसबुक वरून पोलिसांनी त्यांचे लोकेशन शोधले पोलीस समोर येताच दोघांनी पळ काढला. तीन चार किलोमीटर पळाल्यानंतर दोघांनी हातात हात धरत थेट कॅनॉलच्या पाण्यात उडी घेतली. मात्र शेवटी ते पोलिसांच्या हाती लागले. दोघांचे एकमेकाप्रति असलेले प्रेम पाहून पोलिसही भारावून गेले. ही घटना शुक्रवारी वैजापूर तालुक्यातील विरगाव भागात घडली. या घटनेची सर्वत्र चर्चा होत आहे.
हाती आलेल्या मिळालेली माहितीनुसार, वाळूज औधोगिक वसाहतीत 21 वर्षीय मुलगा आईसह किरायची खोली घेऊन राहत होता. दरम्यान, ज्या ठिकाणी किरयाने राहायचा त्याच घरमलकाच्या 15 वर्षीय युवती सोबत प्रेम संबंध जुडले. दोघांच्या गाठी-भेटी वाढल्या. दोघांनी सोबत जगण्या-मरण्याच्या आणाभाका घेत घर सोडण्याचा निर्णय घेतला. आणि शेवटी डिसेंबर 2019 मध्ये दोघेही सैराट झाले. मुलगी घरी मिळून येत नसल्याने मुलीच्या वाडीलाने अपहरणाची तक्रार दिली. त्यानुसार वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी तपास सुरू केला. मात्र दोघांचाही थांग पत्ता लागत नव्हता. याच अल्पवयीन मुलीच्या शोधासाठी सायबर सेल सह दामिनी पथक देखील परिश्रम घेत होते. शेवटी फेसबुक या सोशल माध्यमाच्या आधारे सायबर सेलने त्या मुलाचा लोकेशन ट्रॅक केला. ते वैजापूर तालुक्यातील एका गावात असल्याचे समजले. शुक्रवारी सकाळीच दामिनी पथक औरंगाबादेतून रवाना झाले. स्थानिक पोलिसांची मदत घेत. सायबरकडून मिळालेल्या लोकेशन कडे पथक जात असतानाच रस्त्यातच हे जोडपे दिसले. दोघांनी देखील पोलिसांना पाहिले, पोलीस वाहनातून खाली उतरण्या अगोदरच दोघेही तेथून शेतातील पिकात जिवाच्या आकांताने पळत सुटले. पोलीस ही दोघांना विनंती वजा आवाहन करीत थांबविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष करीत दोघेही पळत होते. तीन ते चार किलोमीटर पळाल्या नंतर समोर वाहणारे पाण्याचे कॅनॉल आले. पोलीस आपल्याला पकडतील आणि समोर रस्ता देखील नाही.अशा परिस्थितीत दोघांनी पोलिसांना शरण जाण्याऐवजी जीवाचा धोका पत्करत दोघांनी एकमेकांचे हात धरत त्या कॅनॉलमध्ये उडी घेतली. हे दृश्य पाहून काहीवेळा पोलिसही चक्रावले. दोघेही एकमेकांच्या सहाऱ्याने पाण्याच्या कॅनॉल मधून बाहेर आले. आणि पुन्हा सुसाट पाळण्यास सुरुवात केली. पोलिसांनी पाठलाग सुरूच ठेवत पाण्यामधून मार्ग काढत त्यांचा शोध घेतला. मात्र समोर उभे उसाचे पीक शोधायचे कसे असा प्रश्न पोलिसांना पडला. पोलिसांनी देखील सापळा रचला आणि चार एकर उभ्या उसाच्या शेतात लपलेल्या या प्रेमीयुगुलाला ताब्यात घेतले.
दीड वर्षांची शोध मोहीम आणि पाच किलोमीटर चा पाठलाग केल्या नंतर हे जोडपे पोलिसांना सापडले याचा आनंद पोलिसांना होताच मात्र दोघांचे एकमेकांवरील दृढ प्रेम,एकमेकावरील विश्वास आणि जीवा पेक्षा एकमेकांची साथ पाहून पोलीस देखील भारावून गेले. पोलिसांनी दोघांना विश्वासात घेत त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार घडत असताना गावकरी बघ्याची मोठी गर्दी झाली होती. मात्र पोलोस कशामुळे दोघांचा पाठलाग करीत आहेत. हे गावकऱ्यांना समजायला मार्ग न्हवता त्यामुळे या प्रकरणाची सर्वत्र खमंग चर्चा सुरू आहे.
क्राईम पेट्रोल सिरीयल पाहून दीडवर्ष पोलिसांना गुंगारा
पोलीस तंत्रशुद्ध तपास करून कशा प्रकारे गुन्हेगाराच्या मुसक्या अवळतात हे टीव्ही सिरीयल मध्ये दाखवले जाते. मात्र हीच सिरीयल पाहून तरुणाने तब्बल दीड वर्ष पोलिसांना गुंगारा दिला. सूत्रानुसार जेंव्हा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. तेंव्हा विचारणा केली असता क्राईम पेट्रोल सिरीयल पाहून पोलिसां पासून लपण्याची युक्ती सुचल्याचे त्याने सांगितले. त्याकडे असलेल्या सिमकार्ड वरून कोणतेही आऊट गोईंग आणि इंनकमिंग कॉल होत नव्हते. फक्त फेसबुकचा वापर दोघेही करायचे. मात्र पोलिसानी तो नवीन सिमकार्ड क्रमांक, फेसबुकवरील माहिती आधारे शोधले आणि दीड वर्षानंतर पोलिसांच्या ताब्यात सापडले.
साहेब कमी वयात प्रेम करणे गुन्हा आहे का?
जेंव्हा पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले तेंव्हा त्यांच्या त्या निरागस मूलीने साहेब कमी वयात प्रेम करणे गुन्हा आहे का? आम्ही काय चूक केली. आमचे दोघांचे एकमेकांवर जीवापाड प्रेम आहे. आम्ही जगु शकत नाही. आम्हला जगू द्या. घरात आई-वडिलांकडून जेवढे प्रेम मिळाले नाही तेवढे प्रेम मला दीड वर्षात मिळाले. आम्हाला सोडा साहेब त्या मुलीचे हे वाक्य एकूण पोलीस देखील काही क्षण भावनिक झाले होते. मात्र पोलिसांचे कायदाने हात बांधले असल्याने त्यांना धीर देण्यापालिकडे ते काहीच करू शकले नाही. असे सूत्रांनि सांगितले.