जेष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे निधन , रंगभूमीवर साकारल्या होत्या थोर पुरुषांच्या भूमिका

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन: ज्येष्ठ तमाशा कलावंत कांताबाई सातारकर यांचे संगमनेर इथे निधन झाले आहे. त्या 82 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती. दरम्यान रघुवीर खेडकर यांच्या कुटुंबातील इतर सदस्य पॉझिटिव्ह होते त्यातील काही जणांना काल घरी सोडण्या, आले आहे. सातारकर यांची मुले, मुली, जावई आणि नातवंडे देखील तमाशा क्षेत्रात कार्यरत आहेत. त्या मूळच्या सातारा येथील आहेत. त्यांनी वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी तमाशा क्षेत्रात पदार्पण केलं

सन 2005 सली महाराष्ट्र शासनानं तमाशा क्षेत्रातील योगदानासाठीचा पहिला विठाबाई नारायणगावकर जीवनगौरव पुरस्कार देऊन कांताबाई यांचा सन्मान केला. दिल्लीत झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा प्रसंगी कांताबाई आणि रघुवीर यांना तमाशा सादर करण्याचा बहुमान मिळाला.

कांताबाई यांच्याविषयी…

गुजरात मधील बडोदा जिल्ह्यातल्या टिंबा या छोट्याशा गावी दगड खाणीत काम करणार्‍या साहेबराव व चंद्राबाई यांच्या दांपत्याच्या पोटी जन्मलेल्या कांताबाई यांना तमाशाचा तसा कोणताही वारसा नव्हता. पुढे त्यांचे आई-वडील सातारा या मूळ गावी आले. तिथे कांताबाई कोणत्याही गुरुविना छोट्या मित्रमैत्रिणींसोबत नृत्य सादर करत. त्यानंतर त्यांना नवझंकार मेळ्यात नृत्याची संधी मिळाली आणि त्यांच्या कलेचा प्रवास सुरू झाला. छोट्या-मोठ्या तमाशात काम करीत त्या मोठी स्वप्ने घेऊन मुंबईला जाऊन पोहोचल्या. मुंबई तमाशा महर्षी तुकाराम खेडकर यांच्या तमाशात एक कलाकार म्हणून काम करता करता त्यांच्यातील अस्सल कलाकार निर्माण झाला. खेडकर आणि कांताबाई या जोडीला अमाप लोकप्रियता मिळाली. पुढे खऱ्या आयुष्यातही ही जोडी एक झाली. असंख्य धार्मिक, पौराणिक, सामाजिक आशय असलेल्या वागनाट्यातून ही जोडी ग्रामीण महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली. मुंबईतला गिरणीकामगार तर या जोडीचा अभिनय बघण्यासाठी पुन्हा पुन्हा हनुमान थिएटर्स ला जात होता.

साकारली होती पुरुष भूमिका

मराठी रंगभूमीवर अनेक पुरुषांनी स्त्रियांच्या भूमिका साकारलेल्या आपण अनेकदा पाहिले आहे. पण सहसा कोणीही स्त्री पुरुषांची भूमिका साकारताना दिसत नाही. पण कांताबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज या सारख्या थोर पुरुषांच्या भूमिका रंगभूमीवर हुबेहूब साकारले आहेत.

पुढे कांताबाई यांचे पती तुकाराम खेडकर यांनी कांताबाई सातारकर यांच्यासह मास्टर रघुवीर खेडकर लोकनाट्य तमाशा मंडळ या नावानं स्वतःचा तमाशा फड चालू केला. कांताबाई या तमाशाचा वारसा घेऊनच जन्माला आल्या होत्या. छोट्या-मोठ्या तमाशात काम करून एक नवीन स्वप्न उराशी बाळगून त्या मुंबईला गेला आणि मुंबईत गेल्यावर त्यांच्या मधील अस्सल कलाकार बाहेर आला.

Leave a Comment