मुंबई । अमित येवले
राज्यातील महामार्गांवर महिलांसाठी जनसुविधा केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नुकताच या जनसुविधा केंद्रांचा जिल्हानिहाय आढावा घेतला.
प्रायोगिक तत्वावर कोल्हापुरात सुरु केलेल्या जनसुविधा केंद्राच्या धर्तीवर राज्यातील सर्व विभागात युद्धपातळीवर जनसुविधा केंद्र कार्यान्वित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच डिसेंबर अखेरपर्यंत प्रत्येक प्रशासकीय विभागात किमान ५० जनसुविधा केंद्र सुरू करावेत, अशा सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी केल्या. यासोबतच राज्यातील सर्व खड्डयांच्या दुरुस्तीच काम डिसेंबरबपर्यंत पूर्ण करण्याचे आदेशही कंत्राटदारांना दिले आहेत.
यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रधान सचिव मनोज सौनिक, सचिव (रस्ते) सी.पी. जोशी, सचिव (बांधकाम) अजित सगणे यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभागाचे सर्व अधिकारी उपस्थित होते.
https://twitter.com/ChDadaPatil/status/1032511535338467329?s=19