व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

उत्तर भारतात भूकंपाचे तीव्र झटके! नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतेच दिल्ली NCR मध्ये भूकंपाचे तीव्र झटके जाणवले आहेत. मंगळवारी दुपारी 3 च्या आसपास भूकंपाचे तीव्र झटके जाणवल्यामुळे नागरिकांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले. या भूकंपाची तीव्रता 4.6 एवढी होती. दिल्लीसोबत उत्तर प्रदेशमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. त्यामुळे सध्या एनसीआरमध्ये गोंधळ उडाला आहे. तसेच, ज्या कार्यालयांना आणि परिसरातील लोकांना हे भूकंपाचे झटके जाणवले तेथील लोक घराच्या बाहेर पडले आहेत. मात्र सध्या स्थिती नियंत्रणात आली असून भूकंपाचा धोका टळला आहे.

आज दिल्लीसह श्रावस्तीमध्येही 2:51 वाजता भूकंपाचे झटके जाणवले आहेत. या भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. इतकेच नव्हे तर, गाझियाबाद, नोएडा, फरीदाबादमध्येही भूकंपाचे धक्के बसले आहेत. सांगितले जात आहे की, या भूकंपाचे मुख्य केंद्र नेपाळ आहे. नेपाळमध्ये भूकंपाची तीव्रता 4.6 इतकी होती. त्यामुळे दोन वेळा भूकंपाचे तीव्र झटके बसले. दरम्यान, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीचे संचालक जेएल गौतम यांनी या भूकंपाविषयी माहिती देताना म्हटले आहे की, “सर्वाधिक तीव्रतेच्या भूकंपाचा केंद्रबिंदू दक्षिण-पूर्व नेपाळमध्ये होता. या भूकंपाची तीव्रता 6.2 इतकी होती. उत्तर प्रदेश व्यतिरिक्त उत्तराखंडमध्ये देखील या भूकंपाचे झटके बसले आहेत. तसेच, नेपाळला लागून असलेल्या बिहार, पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्येही भूकंपाचे झटके जाणवले आहेत. जयपूर, अलवर, राजस्थानमधील नागरीकांना सुमारे 6 ते 7 सेकंदात तीन ते चार झटके जाणवले.