Sex ला खेळाची मान्यता; ‘या’ दिवशी रंगणार चैंपियनशिप

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जगभरात अनेक प्रकारचे खेळ खेळले जातात. यामध्ये आपण आत्तापर्यंत क्रिकेट, फ़ुटबाँल, टेनिस, होलीबॉल, बास्केटबॉल अशा प्रकारचे खेळ पाहिले आहेत. परंतु तुम्हाला हे ऐकून नक्कीच आश्चर्य वाटेल पण आता सेक्स ला (Sex) सुद्धा खेळाची मान्यता मिळाली आहे. होय, स्वीडन हा जगातील पहिला देश बनला आहे, ज्याने सेक्सला खेळ म्हणून मान्यता दिली आहे. स्वीडन आता युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपचे आयोजन करणार आहे.

स्वीडिश सेक्स फेडरेशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेला 8 जूनपासून सुरुवात होणार आहे. हि स्पर्धा अनेक आठवडे चालेल आणि यामध्ये विविध युरोपीय देशांतील सहभागी लोक 16 वेगवेगळ्या विषयांमध्ये स्पर्धा करतील आणि त्यांचे कौशल्य आणि क्षमता दाखवतील. यामध्ये जगभरातील 20 देशांतील स्पर्धकांनी सहभाग नोंदवला आहे. हे स्पर्धक दररोज सहा तासांच्या कठोर सत्रांमध्ये व्यस्त राहतील. या स्पर्धेतील वैयक्तिक “सामने” 45 मिनिटे ते एक तास दरम्यान चालतील.

युरोपियन सेक्स चॅम्पियनशिपमध्ये प्रलोभन, बॉडी मसाज, कामुक क्षेत्रांचा शोध, फोरप्ले, ओरल सेक्स, प्रवेश, सहनशक्ती, शारीरिक देखावा या गोष्टींचा समावेश असेल. त्याचबरोबर प्रत्येक गेममध्ये कोण विजेता ठरणार याचा निर्णयही जज आणि प्रेक्षकांच्या मताने होणार आहे. प्रत्येक विषयात, सार्वजनिक मतदान आणि पाच न्यायाधीशांच्या पॅनेलद्वारे निर्धारित केल्यानुसार सहभागी 5 ते 10 गुण मिळवू शकतात. स्पर्धकांना पुढे जाण्यासाठी प्रत्येक लेव्हलला विशिष्ट गुण मिळवणे आवश्यक आहे.