संतापजनक! चाॅकलेट खायला देऊन मुलीवर लैंगिक अत्याचार; ‘या’ प्रकारे झाला घटनेचा खुलासा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

पिंपरी : हॅलो महाराष्ट्र – मुळशी तालुक्यातील माण या ठिकाणी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये आरोपीने अल्पवयीन मुलीला चाॅकलेट खायला दिले. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर जेव्हा ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली तेव्हा हि संतापजनक घटना उघडकीस आली.

ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू असे आरोपी तरुणाचे नाव आहे. पीडित 16 वर्षीय मुलीच्या वडिलांनी याप्रकरणी आरोपी ग्यानरंजन उर्फ मंगू ताडू याच्याविरोधात हिंजवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. अल्पवयीन मुलीच्या वाढदिवसानिमित्त आरोपी चाॅकलेट घेऊन आला होता.

यानंतर दोन दिवसांनी पीडित मुलीचे आईवडील व भाऊ हे कामानिमित्त बाहेर गेले होते. त्यादरम्यान आरोपी फिर्यादीच्या घरी आला. त्याने अल्पवयीन पीडित मुलगी व तिच्या लहान भावाला चाॅकलेट खायला दिले. चाॅकलेट खाल्ल्यावर पीडित मुलीला झोप आली. त्यानंतर आरोपीने पीडित मुलगी झोपल्यावर तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. यानंतर पीडित अल्पवयीन मुलगी चार महिन्यांची गर्भवती राहिली. हि गोष्ट पीडित मुलीच्या घरच्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.