व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

शहाजीबापूंनी विमान प्रवासात झुनका भाकरी खातानाचा फोटो केला पोस्ट; लोक म्हणाले…

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजीबापू पाटील आपल्या काय झाडी, काय डोंगर आणि काय हॉटेल या गावरान डायलॉग मुळे चर्चेत आलेत. शहाजीबापू त्यानंतर एका फेमस स्टार प्रमाणे संपूर्ण राज्यभर प्रसिद्ध झाले. त्यांच्या या डायलॉग बाजीचे समर्थन करणारेही लोक त्यांना मिळाली आणि टीकाकरांच्या टीकेलाही त्याना सामोरे जावे लागले. त्यातच आता शहाजी बापूंनी आपल्या विमान प्रवासादरम्यान झुणका भाकरी खात असलेला फोटो शेअर केला. त्यानंतर सोशल मीडिया युजर्सने कमेंट्सचा पाऊस पाडला आहे.

काय आहे शहाजीबापू यांची फेसबुक पोस्ट-

भौतिक सोई-सुविधा कितीही मिळतील हो… पण आपल्या अस्सल झुणका-भाकरीची चव जर या भौतिक सुविधेतही मिळाली तर त्याची सर कशालाच नाही ! जळगाव-मुंबई प्रवासात आज झुणका-भाकर खाण्याचं समाधान एकदमच ओक्केच होतं ! अस म्हणत शहाजीबापू यांनी विमान प्रवासातील आपले फोटो शेअर केले.

https://m.facebook.com/story.php?story_fbid=pfbid0YL4C4at1ohyxW57w4uiJw5uSEmgBvHJM1BSSPFjcsPvB7tj81QDNHx7diyrpRecml&id=100077163664337

शहाजीबापू यांच्या पोस्टवर नेटकऱ्यानी कॅमेंट्सचा पाऊस पाडला. कोणी म्हणत बापू तुम्हे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. तर कोणी म्हणत आधी घरच्यांना लुगडं घेऊन द्या.. काही यूजर्सनी तर त्यांना पुन्हा एकदा ५० खोके एकदम ओक्के म्हणत डिवचण्याचा प्रयत्न केला.

 

काही टीकाकरांनी शहाजीबापू याना थेट राजकारणातील जॉनी लिव्हर म्हंटल आहे. तर मराठा रांगडा आमदार असं म्हणत काही जणांनी शहाजीबापूंचे समर्थन देखील केल्याचे पाहायला मिळाले. एकूणच म्हणजे शहाजीबापू यांचा विमान प्रवास अन त्यात खाल्लेली झुणका भाकर सोशल मीडियावर मात्र जोरदार चर्चेत आली. सगळं कस एकदम ओक्के सारख….