शाहीर दीनानाथ साठे-वाटेगावकर यांचे निधन; वयाच्या 84 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| नुकतीच मराठी सिनेसृष्टीला धक्का देणारी एक मोठी बातमी समोर आली आहे. शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांचे वयाच्या 84 व्या वर्षी वृद्धापकाळाने निधन झाले आहे. मुळचे सांगली जिल्ह्यातील वाटेगाव येथील असणारे शाहीर दिनानाथ साठे संपुर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध होते. त्यांच्यामागे पत्नी, दोन मुलं, चार मुली आणि नातवंड असा परिवार आहे. काही काळापूर्वी दीनानाथ साठे हे पुणे जिल्हा परिषदेतून उपजिल्हा क्रीडा अधिकारी सेवेतून निवृत्त झाले होते.

लोकप्रिय असणाऱ्या शाहीर दीनानाथ साठे- वाटेगावकर यांनी 1969 पासून ते आजवर अनेक वेगवेगळ्या ठिकाणी शाहिरीचे कार्यक्रम केले. तसेच त्यांनी आपल्या शाहिरीतून समाजाची व्यथा मांडत शाहिरांच्या न्याय्य हक्कांसाठी आणि काही मागण्यांसाठी देखील आंदोलने केली. आजवर त्यांनी अनेक सामाजिक संस्थांमध्ये मोलाचे कार्यही केली. आपल्या शाहिरीतून त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात आपली ओळख निर्माण केली.

1956 साली शाहीर दीनानाथ हे शिक्षणासाठी आपले गाव सोडून पुण्याला आले. त्यांनी पहिल्यांदा के. टी. मंगल विद्यार्थी मंडळामार्फत टी. डी. गायकवाड, दादासाहेब पवार, शंकरराव मात्रे यांच्यासह सामाजिक कार्याला सुरुवात केली. तसेच त्यांनी या कार्याबरोबर शाहिरी जतन करण्यासाठी आणि समाजाचे प्रश्न मांडण्यासाठी शाहिरी करण्यास सुरुवात केली. 1969 पासून त्यांनी शाहिरीचे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी घेतले. शाहीर दीनानाथ यांच्या सामाजिक क्षेत्रातील मोलाच्या योगदानामुळे त्यांना ‘लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार’ने देऊन गौरवण्यात आले.