…तर बेळगावात घुसून शिवरायांना अभिवादन करू, कळूही द्यायचो नाही; शहाजीबापूचं सूचक विधान

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या कर्नाटक व महाराष्ट्र यांच्या सीमावादामुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. अशात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यानी महाराष्ट्रातील मंत्र्यांनी बेळगावात येऊ नये, असे म्हंटले असल्याने यावरून आता शिंदे गटाचे आमदार आक्रमक झाले आहे. शिंदे गटाचे नेते आमदार शहाजी बापू पाटील यांनी थेट इशारा दिला आहे. “पक्षाने आदेश दिला ना तर मी थेट बेळगावात जाऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून येईन. फक्त पक्षाने तसा आदेश द्यायल हवा, असे सूचक विधान पाटील यांनी केले आहे.

पंढरपुरात आज दिव्यांग दिना निमित्ताने संवाद दिव्यांगांशी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास आमदार शहाजी बापू पाटील उपस्थित होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, पक्षाने फक्त आदेश द्यावा. मी कुठनं तरी घुसून महाराजांना हार घालून येईन कळूही द्यायचो नाही.

दरम्यान, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आणि उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई हे दोन मंत्री बेळगावमध्ये जाऊन महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची भेट घेणार आहेत. आम्ही येऊ नये, असे कर्नाटक सरकारने कळवलं असलं तरीही बेळगाव आणि आजूबाजूच्या गावांमध्ये आम्ही 6 डिसेंबर रोजी जाणारच, असा इशारा शंभूराज देसाई यांनी काल दिला आहे.