छत्रपती शाहू महाराजांकडे आहे तब्बल 297 कोटी रुपयांची संपत्ती; तर एकही रूपयाचे कर्ज नाही

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| येत्या लोकसभा निवडणुकीसाठी कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातून छत्रपती शाहू महाराज (Chhatrapati shahu Maharaj) मैदानात उतरले आहेत. त्यामुळे कोल्हापुरात शाहू महाराज विरुद्ध महायुतीचे संजय मंडलिक अशी लढत पाहिला मिळणार आहे. महत्वाचे म्हणजे, निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरताना शाहू छत्रपती यांनी संपत्तीची माहिती प्रतिज्ञापत्राद्वारे दिली आहे. या प्रतिज्ञापत्रात त्यांनी आपल्याकडे 297 कोटी रुपयांची संपत्ती असल्याचे सांगितले आहे. तसेच, त्यांनी ही आपल्या संपत्तींबाबत इतर माहितीही प्रतिज्ञापत्रात दिली आहे.

शाहू महाराज यांची संपत्ती

मिळालेल्या माहितीनुसार, महाविकास आघाडीच्या बाजूने लोकसभा निवडणूक लढवत असलेल्या शाहू महाराज यांच्याकडे 297 कोटी रुपयांची संपत्ती आहे. तसेच त्यांच्याकडे असलेल्या जमिनीची किंमत 122 कोटी रुपये इतकी आहे. शाहू महाराज यांच्याकडे असलेल्या आलिशान वाहनांची किंमत 6 कोटींच्या वर आहे. इतकेच नव्हे तर, 1 कोटी 56 लाखांचे सोने 55 लाखांचे चांदीचे त्यांच्या जवळ आहेत. शाहू महाराज यांच्याकडे 122 कोटी 88 लाख रुपयांची शेतजमीन आहे. यासह 147 कोटी 64 लाख 49 हजार रुपयांची जंगम मालमत्ता आहे. ही सर्व माहिती स्वतः शाहू महाराज यांनी नामनिर्देशन पत्रात दिली आहे.

एकही रुपयांचे कर्ज नाही

शाहू महाराज यांच्या नावाने कोणत्याही बँकेमध्ये कर्जाची नोंद नाही. तसेच त्यांच्यावर कोणत्याही प्रकारच्या कर्जाचा डोंगर नाही. मात्र त्यांच्या विरोधात एक गुन्हा दाखल झालेला आहे. हा गुन्हा याच महिन्यात लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात नोंदवण्यात आला आहे. दरम्यान, शाहू महाराजांच्या पत्नी याज्ञसेनीराजे यांच्या नावे 17 कोटी 35 लाख जंगम मालमत्ता आहे. तसेच, 23 कोटी 71 लाखांची स्थावर मालमत्ता त्यांच्याजवळ आहे. याज्ञसेनीराजे यांच्याकडे 7 कोटी 52 लाख रुपयांची शेतजमीन देखील आहे.