शाहुपुरी पोलिसांचा तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा, सहाजण ताब्यात

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी शुभम बोडके

शाहुपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडुन तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा टाकण्यात आला. बुधवार नाक्यावरील या कारवाईत एकुण 1 लाख 51 हजार 200 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 6 जणांना ताब्यात घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी, आज दि. 29 रोजी पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांना गोपनिय बातमीदारामार्फत बातमी मिळाली होती. सातारा शहरातील बुधवार नाका येथील सर्व्हिसिंग सेंटरचे पाठीमागे अवैध तीनपानी मटका जुगार चालु आहे. त्या अनुषंगाने पोलिसांनी छापा टाकला. तेव्हा अवैध तीनपानी मटका जुगार चालु असल्याचे आढळून आले.

या छाप्यात रविंद्र शंकर आवळे (वय-35 वर्षे. रा.270, बुधवारपेठ, सातारा), शामराव यशवंत कुऱ्हाडे (वय-40 वर्षे रा.ऐक्यप्रेस कॉर्नर, नामदेववाडी झोपडपट्टी, सातारा), मनोज संपत माने ( वय- 49 वर्षे रा.198, बुधवार पेठ, सातारा), रामा यमनप्पा देऊर (रा. आकाशवाणी केंद्राचे समोर, आकाशवाणी झोपडपट्टी, सातारा), दिलीप प्रभाकर गायकवाड (रा. प्लॉट नं. 65, मेहेर देखमुख कॉलनी, करंजे, सातारा), कल्याण मारुती खवले (रा. सिटी कोर्ट बिल्डींगचे पाठीमागे, मोळाचा ओढा, सातारा) यांना ताब्यात घेण्यात आले. तसेच त्यांचेकडुन अवैध जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल हॅन्डसेट व मोटार सायकल असा एकुण 1,51,200/- रुपये किंमतीचा जुगाराचा मुद्देमाल जप्त केला. वरील सर्व 6 इसमांविरुदध शाहुपुरी पोलीस ठाणेस अवैध जुगार खेळत असले बाबत गुन्हा दाखल करणेत आला आहे.

सदरची कारवाई पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक अजित बोऱ्हाडे व पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांचे मार्गदर्शनाखाली पो. हेड. कॉ. हसन तडवी, लैलेश फडतरे, पो. ना. अमित माने, स्वप्निल कुंभार, ओंकार यादव, पो. कॉ. सचिन पवार, स्वप्निल सावंत यांनी केली.