Shaktipeeth Expressway : राज्य शासनाने महत्वाचे रस्ते प्रकल्प हाती घेतले आहेत. यात मुंबई कोस्टल रोड, नागपूर- गोवा शक्तीपीठ हायवे अशा मोठ्या प्रकल्पांचा समावेश आहे. मात्र 13 जिल्ह्यांमधून जाणाऱ्या नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गामध्ये (Shaktipeeth Expressway) अडथळा निर्माण झाला आहे. सध्या जमीन अधिग्रहणाच्या कामासाठी सर्वे करण्यात येत आहे. सरकारच्या या महत्वकांक्षी प्रकल्पासाठी नक्की कोणता अडथळा आला आहे जाणून घेऊयात…
नागपूर ते गोवा या नव्या 800 किमी च्या शक्तीपीठ महामार्गासाठी सर्वेक्षण सुरू आहे. मात्र कोल्हापूर जिल्ह्यातून या महामार्गाला विरोध वाढत असल्याचे दिसत आहे. प्रस्तावित महामार्गात जमिनी जाणाऱ्या कागल तालुक्यातील शेतकऱ्यांमधून (Shaktipeeth Expressway) हा विरोध होत असून तालुक्यातले शेतकरी आता एकवटले आहेत. शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीच्या माध्यमातून त्यांनी आपला लढा सुरू केला आहे.
काय आहे शेतकऱ्यांचे म्हणणे ? (Shaktipeeth Expressway)
येथील शेतकऱ्यांनी (Shaktipeeth Expressway) दिनांक 26 फेब्रुवारी रोजी जिल्हा प्रशासनाला निवेदन देत महामार्गासाठी सुरू असणारा सर्वे तात्काळ बंद करण्याची मागणी केली आहे. नव्या शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. शिवाय राज्य आणि राष्ट्रीय महामार्ग असताना नव्या महामार्गाची गरज काय असा सवाल या संतप्त शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे.
21 तासांचा प्रवास 11 तासांवर येणार
MSRDC ने या शक्तीपीठ महामार्गाची अलाइनमेंट म्हणजे संरेखन अखेर निश्चित केले आहे. या अलाइनमेंटनुसार ‘शक्तिपीठ’ (nagpur -goa shaktipeeth expressway) मार्ग आता 760Km ऐवजी 805Km किमी लांबीचा असणार आहे. या मार्गाचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे नागपूर ते गोवा हा सद्यस्थितीला 21 तासांचा प्रवास हा साधारणतः निव्वळ अकरा तासांवर येणार आहे.
‘या’ जिल्ह्यांमधून जाणार मार्ग (Shaktipeeth Expressway)
दरम्यान शक्तीपीठ एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर व सिंधुदुर्ग या बारा जिल्ह्यातून पुढे कोकण द्रुतगती महामार्गास गोवा महाराष्ट्र सरहद्दीवर जोडण्यात येणार आहे.